साहील तांबट, रूमा गैकिवारी यांची विजेतेपदाला गवसणी

रावेतकर करंडक सोलारीस क्‍लब अखिल भारतीय मानांकन अजिंक्‍यपद मालिका टेनिस स्पर्धा

पुणे: पुण्याच्या साहील तांबट याने मुलांच्या गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा तर रूमा गैकिवारी मुलींच्या गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या सोलारीस क्‍लब तर्फे आयोजित “रावेतकर करंडक’ सोलारीस क्‍लब अखिल भारतीय अजिंक्‍यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (16 वर्षाखालील) स्पर्धेचे विजेतेपद मिळवत दिवाळीचा आनंद व्दिगुणीत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोथरूड येथील सोलारीस क्‍लब, मयुर कॉलनी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुलींच्या गटात बिगर मानांकित रूमा गैकिवारी हिने सहाव्या मानांकित श्रावणी खवाळे हिचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. फॉर्ममध्ये असलेल्या रूमा हिने कालही आठव्या मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरी गाठली होती. आज तिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवताना सहाव्या मानांकित श्रावणीचे आव्हान मोडून काढत विजेतेपद मिळवले.
मुलांच्या गटात अग्रमानांकित व पुण्याच्या साहील तांबट याने दुसर्या मानांकित सिध्दार्थ जाडली याचा पराभव करून विजेतेपद मिळवले. साहीलने पहिला सेट 6-2 असा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले. दुसर्या सेटमध्ये साहील 3-0 असा आघाडीवर असताना सिध्दार्थने प्रकृती अस्वास्थ्यामुळे सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीस क्‍लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली व रावेतकर ग्रुपच्या सरव्यवस्थापिका रूपा दंताळे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संचालक रविंद्र पांड्ये, क्‍लब व्यवस्थापक राजेश सकपाळ व एमएसएलटीए निरिक्षक तनया गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. विजेत्या साहील आणि रूमा यांना 15 एआयटीए गुण तर, उपविजेत्या खेळाडूंना 10 गुण देण्यात आले. उपांत्य फेरीतील खेळाडूंना 7 गुण मिळाले.

सविस्तर निकालः
मुलींचा गट – उपांत्य फेरी –
रूमा गैकिवारी वि.वि. मान्या बरांगे 9-3, श्रावणी खवाळे (6) वि.वि. साझ तांदेळ 9-2,
अंतिमः रूमा गैकिवारी वि.वि. श्रावणी खवाळे (6) 6-2, 6-1;
मुलांचा गटः उपांत्य फेरीः
साहील तांबट (1) वि.वि. प्रसाद इंगळे (3) 9-3, सिध्दार्थ जाडली (2) वि.वि. मानस धामणे (6) 9-7.
अंतिमः साहील तांबट (1) वि.वि. सिध्दार्थ जाडली 6-2, 3-0, सामना सोडून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)