अद्ययावत बसस्थानक लवकरच ‘संगमनेर’करांच्या सेवेत

या सुविधांचा समावेश

मुख्य इमारतीत चौकशी कक्ष, तिकीट, पासधारक, रोकड विभाग, चालक व वाहक, विश्रांती कक्ष, विश्रामगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, दोन सुलभ शौचालये, स्वच्छतागृहे, पोलीस कक्ष, हिरकणी कक्ष, आगनियंत्रणासाठी 50 हजार लिटरची पाण्याची स्वतंत्र टाकी, भूमिगत गटार व विजवहिन्या, सुखकर आसनव्यवस्था, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था.

संगमनेर – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुमारे सात एकरावर दोन वर्षांपासून राज्यातील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. या काळात प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काटेकोर काळजी घेत महाराष्ट्रातील आकर्षक बसस्थानक पूर्णत्वास येत असून लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुढील 50 वर्षांचे नियोजन करून 2014 मध्ये बसस्थानकाचे भुमिपूजन केले होते. सुविधायुक्त बसस्थानक करण्याकडे त्याकडे कटाक्षाने लक्ष दिले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिवसभरात हजारो प्रवासी शेकडो बसची वर्दळ असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्याचे आव्हान होते ठेकेदार आर. एम कातोरे यांनी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे आव्हान स्वीकारले.

 “प्रवाश्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे. ते बस स्थानक राज्यातील एकमेव हायटेक बस्स्थाकन आहे. काम अंतिम टप्यात असून तीन महिन्यात उर्वरित काम पूर्ण होणार असून लवकच नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
– आर. एम कातोरे , ठेकेदार.

पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या आवारातील दत्त मंदिराच्या बांधकामाने कामाचा श्रीगणेशा झाला. दुमजली व्यापारी संकुले, तांत्रिक विभागातील कॉंक्रिटीकरण, संरक्षण भिंत यांसह आस्थापना विभागाची कार्यालये व फलटांचे काम 30 महिन्यांची मुदत असलेली सुमारे 80 टक्के कामे 25 महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. पूर्वीची मोठी झाडे तसेच घेऊन बांधकाम करण्यात आले नव्याने कडूनिंबाची 50 झाडे लावली आहेत. हे बसस्थानक संगमनेरच्या वैभवात नव्याने भर घालत आहे.

-प्रकल्प किंमत -25 कोटी
-बसस्थानक व व्यापारी संकुल बांधकाम 5900 चौरस मीटर
-व्यापारी गाळे -109
-करार कालावधी -30 वर्षे

संगमनेर बसआगारची स्थिती

65 बसच्या 528 फेऱ्या, बसची संख्या – 612, शिवशाही – 20, चालक – 122, वाहक -127, यांत्रिकी कर्मचारी 50, अधिकारी – 4, पासधारक विध्यार्थी – 8000, इतर प्रवास – 10 हजार,चौकशी कक्ष 24 तास.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
42 :thumbsup:
32 :heart:
0 :joy:
12 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)