नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे. साध्वी प्रज्ञा भोपाळमधून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसने भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता साध्वी विरुद्ध दिग्विजय असा सामना रंगणार आहे.
भाजप प्रवेश केल्यानंतर साध्वी प्रज्ञा म्हणाल्या कि, मी औपचारिकरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी निवडणूक लढणारही आणि जिंकणारही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सकाळीच साध्वी प्रज्ञा यांनी भाजप कार्यालयात वरिष्ठ नेता शिवराज सिंह चौहान, रामलाल आणि प्रभात झा यांची भेट घेतली.
Sadhvi Pragya Singh Thakur in Bhopal: I have formally joined BJP, I will contest elections and will win also. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/siAsXSMm1U
— ANI (@ANI) April 17, 2019
दरम्यान, मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या. या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.