भोपाळ – 2019 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली आहे. लोकसभेच्या 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपच्या उमेदवार ‘साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर’ यांनी सुद्धा आज मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
Madhya Pradesh: BJP Bhopal candidate Pragya Singh Thakur after casting her vote. Digvijaya Singh is the Congress candidate from the constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/d0Rc2RgwKO
— ANI (@ANI) May 12, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह विरोधात भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक काळात अनेक अडचणींचा सामना करावाला लागला होता. त्यामुळे या लक्षवेधी लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेश (14 जागा), हरियाणा (10 जागा), झारखंड (4 जागा) बरोबरच बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्याशिवाय, दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा निवडून देण्यासाठी मतदार त्यांचा हक्क बजावणार आहे. या टप्प्यात 10 कोटींहून अधिक मतदार त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी पात्र आहेत.