सुगी आली की अस्वलाला घेऊन दरवेशी बाहेर पडतात : सदाभाऊ खोत

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना टोला

कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्याचे विद्यमान कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत आणि शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज कोल्हापूर येथे बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली. “सुगी आली की अस्वलाला घेऊन दरवेशी बाहेर पडतात आणि सुगीच्या काळापर्येंत ते अस्वलाला नाचावणार आहेत, त्यात आता फारसा दम नाही,” असे म्हणत सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टी यांना अस्वलाची उपमा दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“ऊस दरातील एफ आर पी अधिक दोनशे रुपये देण्याचं वचन स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथील वारणानगर येथे येऊन शेतकऱ्यांना दिलं आहे. शेतकऱ्यांची पै आणि पै देण्याचं वचन ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल असताना अशा स्थितीत आता राजू शेट्टी यांच्याकडे कुठलाच नवीन मुद्दा नसल्याने त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांची डोकं फिरवण्याची कामे सुरू केली आहेत.” असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

“एका बाजूला राज्यशासन शेतकर्‍यांसोबत असताना देखील दुसर्‍या बाजूला आता कोणताच पर्याय नाही असा आव आणत राजू शेट्टी स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलनाचे हत्यार उपसत आहेत.” असा आरोप सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)