सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर रिलिज

बहुप्रतिक्षित वेब सीरिज “सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्‍सवर स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट 2019 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये मिळालेल्या यशा मुळे दुसऱ्या सिझन बाबत सर्वांना उत्सूकता लागून राहिली असतानाच हा ट्रेलर यंदाच्या सिझनची उत्सूकता आणखीनच तानतो.

ट्रेलरची सुरूवातच गायतोंडेने बंटीला केलेल्या फोनने होते. त्यामुळे अनुत्तरीत प्रश्‍न असलेले त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे “सेक्रेड गेम्स 2’मध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, दिलबाग सिंग, सरताज सिंग, बंटी यांच्याभोवती ही कहाणी फिरते. त्याच बरोबर बहु प्रतिक्षीत गुरूजी हे पात्र देखील यंदाच्या मोसमात उलगडले जाणार आहे.
सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन अनुराग कश्‍यप, विक्रमादित्य मोटवाणीने मिळून दिग्दर्शित केला होता. दुसरा सीझन अनुराग कश्‍यप, नीरज घेवानने दिग्दर्शित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सीझनमध्ये इतर कलाकारांसोबत कल्की कोचलीन, रणवीर शौरे हे दोन नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. पहिल्या सीझनमध्ये राधिका आपटे आणि कुब्रा सैतची महत्त्वाची भूमिका होती. पहिल्या सीझनमध्ये नवाजुद्दीनसोबत बंटीची भूमिका साकारणारा अभिनेता जतिन सरनादेखील दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे. ट्रेलरचे मीम्सदेखील इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)