क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचे निधन

मुंबई: आंतराष्ट्रीय क्रिकेटला महान खेळाडू देणारे क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट विश्वातील क्रिकेट महर्षी म्हणून त्यांनी ओळख होती. क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली.

रमाकांत आचरेकर यांनी भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार आदी खेळाडू दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.  गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे, अन्न पातळ करुन भरवलं जात होतं. मात्र आज, संध्याकाळच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2010 मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12 फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)