#HBD : भारतीय वेगवान गोलदांज ‘ईशांत शर्माला’ सचिनच्या हटके शुभेच्छा

सचिनने सांगितले ईशांतच्या उंचीचे राज

भारतीय संघाचा वेगवान गोलदांज ईशांत शर्मा याचाआज 30 वा वाढदिवस आहे. ईशांतचा जन्म 2 सप्टेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. आज त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतच आहेत, पण भारताचा माजी किक्रेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने वेगळ्याच अंदाजात ईशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या वाचून तुम्हीपण हसाल.

सचिनने ट्विटरवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, ‘झाडावरून नारळ काढता काढता ईशांत लंबू झाला. तुझा जन्मदिवस हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यासाठी एक चांगला दिवस ठरू शकतो’. सचिनने या संदेशासोबत नारळाच्या झाडाची इमोजी सुध्दा लावली आहे.

सचिनकडून गंमतीदार अंदाजात दिल्या गेलेल्या शुभेच्छा संदेशावर एका ट्विटर यूजर ने कमेंट करत म्हटले आहे, ‘सर तुमच्यावर वीरू पाजीचा प्रभाव पडला आहे’. दरम्यान क्रिकेटमधून वीरेंद्र सेहवाग निवृत्त झाल्यापासून ट्विटरवर नेहमी सक्रीय असतो. तो ट्विटरवर इतरांना खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. त्याचा हा अंदाज लोकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.

ईशांत शर्मा याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात नुकत्याच 250 विकेट पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलदांज ठरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)