भारतानं विश्वचषकात पाकिस्तान विरूध्द खेळावं…पण – सचिन तेंडूलकर

नवी दिल्ली – एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात ३० मे पासून होणार असून यामध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. वृत्तानुसार बीसीसीआयही सरकारसोबत आहे. आणि सरकारचा प्रत्येक निर्णय बीसीसीआयला मान्य असणार आहे.

यासंदर्भात अनेक भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानशी क्रिकेटच्या मैदानात भिडून त्यांना मात द्या, असं काल सुनिल गावसकर यांनी यांसदर्भात आपले मत मांडले. त्यानंतर भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाज आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने सुध्दा याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सचिन तेंडूलकरने म्हटले आहे की, ‘भारतीय संघाने विश्वचषकात नेहमीच पाकिस्तान संघावर मात केली आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा हरविण्याची ही वेळ आहे. जर आपण त्यांना हरवले तर आपल्याला दोन गुण मिळणार आहेत. आणि नाही खेळलो तर त्यांना दोन गुण मिळतील म्हणजेच पाकिस्तानला मदत केल्यासारखे आहे. मी पाकिस्तान दोन गुण असचं मिळवून देणं मला पटत नाही. अर्थात मी देशासोबतच आहे. माझ्यासाठी भारत देश आधी असून त्यामुळ भारत सरकार जो काही निर्णय घेईल मी त्यासोबत मनापासून असेल. सरकारने जर ठरवले की पाकिस्तानसोबत खेळायचे नाही तर मी सरकारसोबतच आहे’.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)