सचिन तेंडुलकर भेटले शरद पवारांना; राजकीय चर्चांना उधान

मुंबई- भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली तसेच ही भेट नियोजित होती, दोघांमध्ये सकाळी 10.45 ते 11.15 दरम्यान अर्धा तास चर्चादेखील झाली. मिळालेल्या माहितीनुसार सचिन आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. अशातच सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण असून सचिन तेंडुलकरच्या या भेटीमागे काही राजकीय कारण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या महिन्यात सचिनने तिसऱ्यांदा पवारांची भेट घेतली आहे. एकाच महिन्यातील सतत भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये सुद्धा या भेटीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)