‘सचिन तेंडुलकर’ आणि ’24’ तारीख काय आहे खास कनेक्शन ? जाणून घ्या…

पुणे – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 24 तारीख याचं एक खास कनेक्शन आहे. हा तो दिवस आहे, त्यादिवशी सचिनने आपल्या जीवनाची सुरूवात केली, त्याचबरोबर याच तारखेदिवशी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक ध्येयं निश्चित केली. जाणून घेऊया सचिनसाठी 24 तारीख का महत्वाची आहे….

31 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 664* धावांची विक्रमी भागीदारी केली होती…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

24 फेब्रुवारी 1988 – आज 31 वर्षापूर्वी लहानसा सचिन माध्यमाच्या प्रकाशझोतात आला होता, ज्यामुळे त्याला क्रिकेट विश्वात ओळख मिळाली होती. सचिनने आपला बालमित्र विनोद कांबळी यांच्यासोबत हॅरिस शील्ड स्पर्धेच्या उपांत्यफेरीत नाबाद 664 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. यामध्ये सचिनने नाबाद 326 आणि कांबळीने नाबाद 349 धावा केल्या होत्या. त्यावेळेस काबंळी 16 तर सचिन 14 वर्षांचा होता. ही भागीदारी त्यावेळेस कोणत्याही श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी ठरली होती. सचिन-कांबळी यांनी आॅस्ट्रेलियन जोडी टी. पैटाॅन आणि एन. रिपाॅन यांचा विक्रम मोडीत काढला होता. बुफैले संघासाठी या जोडीने 1913-14 मध्ये 641 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान 19 वर्षानंतर हैदराबादमध्ये मनोज कुमार आणि मो. शैबाज यांनी 721 (तिसऱ्या विकेटसाठी) धावांची भागिदारी करत हा विक्रम मोडीत काढला होता.

9 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक व्दिशतक पूर्ण केले होते.

24 फेब्रुवारी 2010 – आजच्या दिवशी 39 वर्षीय सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनला. ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात सचिनने 147 चेंडूत नाबाद 200 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षानंतर वीरेंद्र सेहवागने 219 धावा करत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनसह इतर 8 खेळाडूंनी व्दिशतक झळकावले आहेत. रोहित शर्मा याने एकट्याने तीन व्दिशतके केली आहेत.

आणखी काही 24 तारखेसंबंधी सचिनची कनेक्शन –

24 नोव्हेंबर 1989 – यादिवशी सचिनने 16 व्या वर्षी आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील पहिल अर्धशतक केलं होतं. पाकिस्तान विरूध्द फैसलाबादमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकं करण्याचा कारनामा त्यानं केला होता.

24 एप्रिल 1973 – सचिनचा जन्मदिवस

24 मे 1995 – सचिनचा विवाह झाला.

24 सप्टेंबर 1999 – सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा जन्मदिवस.

तसेच 1989 ते 2013 अशी एकूण 24 वर्षाची त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारर्कीद राहिली.

https://twitter.com/mipaltan/status/400254993938145280

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)