जिल्हा मल्लखांब संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन पुरोहित

येरवडा – पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र मंडळाचे सचिन पुरोहित, कार्याध्यक्षपदी धनंजय दामले यांची निवड झाली, तर सचिवपदी अभिजित भोसले यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कार्यालयात संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडली. यासभेत पुढील 5 वर्षांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.

अध्यक्ष -सचिन पुरोहित, कार्याध्यक्ष -धनंजय दामले, सचिव – अभिजित भोसले, उपाध्यक्ष -रवींद्र पेठे (मिलेनियम स्कूल), विकास फाटक (महाराष्ट्रीय मंडळ), रुपाली मडके (स्वामी समर्थ स्पोर्टस्‌ ऍकॅडमी),सहसचिव – तुषार भरगुडे (ज्ञानप्रबोधिनी) आणि पंकज शिंदे (वेदांत अकादमी), कार्यकारिणी सदस्य -दयानंद पाटील (भैरवनाथ क्रीडासंकुल), चिन्मय पाटील (मल्लखांब स्पोर्टस्‌ अकॅडमी),स्वाती सातपुते (डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल), संजय सूर्यवंशी (नवजीवन स्पोर्टस्‌ फाउंडेशन) यांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)