सचिनने केले ‘या’ दोन भारतीय खेळाडूंचे कौतुक!!!

सर्वकालीन महान फलंदाजांपैकी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत उत्तम कामगिरी करणाऱ्या त्याने हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत भारतीय खेळाडूंची प्रशंसा केली आहे. हार्दीक पंड्या याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत  पाहल्या डावात पाच बळी मिळवले आणि इंग्लंडला १६१ धावात सर्वबाद करण्यात मोठा वाटा उचलला.

आपली पदार्पणची कसोटी खेळणाऱ्या रिषभ पंत याचेही सचिनने कौतुक केले. पंतने यष्टीरक्षक म्हणून खेळताना पाच झेल टिपत आपले काम चोख बजावले. त्याचबरोबर त्याने  पदार्पण करताना फलंदाजीमध्ये आल्यावर दुसर्याच चेंडूवर सिक्सर मारला होता हे हेही  विशेष.

दुसर्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतीय संघाने दुसर्या डावात २ बाद १२४ धावा केल्या होत्या. पुजारा ३३ तर विराट कोहली ८ धावांवर खेळत आहे. पूर्ण धावसंख्या मिळून भारतीय संघाने २९२ धावांची धावांची आघाडी घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)