सचिन पायलटांचे भाजपावर टीकास्त्र

कपड्यांच्या रंगावरून काँग्रेस भेदभाव करत नाही

जयपूर – राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. सचिन पायलट म्हणाले, भाजपा पार्टीप्रमाणे काँग्रेस पार्टी कपड्यांच्या रंगावरून लोकांसोबत भेदभाव करत नाही. पायलट यांचे हे वक्तव्य काळे कपडे परिधान केलेल्या लोकांना रॅलीमध्ये सामिल होऊ न देण्याच्या कथित घटनांच्या संबंधात केले गेले आहे.

सचिन पायलट म्हटले की, लाल, काळा, हिरवा किवां पिवळा अशा कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केलेल्या लोकांचे पार्टीच्या रॅलीत स्वागत आहे. काॅग्रेस कपड्यांच्या रंगाच्या अधारे लोकांशी भेदभाव करत नाही.

तसेच ते पुढे म्हणाले , प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अस वाटत की , शेतकरी किंवा सामान्य माणूस त्यांच्या पक्ष्यांच्या रॅलीमध्ये येऊन विरोधात प्रदर्शन करतील. त्यामुळे काळ्या रंगाचे शर्ट किंवा बनियन परिधान केलेल्या लोकांना भाजपा पक्ष रॅलीमध्ये समाविष्ट होण्याची परवानगी देत नाही.

दरम्यान आज राहुल गांधी हे जयपूरमध्ये आले होते, आणि त्यांनी त्याठिकाणी रॅलीला संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)