रशियाच्या सोयुझ रॉकेटचे इमर्जन्सी लॅन्डिग

मॉस्को: रशियाच्या सोयुझ नावाच्या अंतराळयानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. या यानात रशिया आणि अमेरिकेचे दोघे अंतराळवीर त्याचबरोबर चालकांच्या टीममधील दोघे असे एकूण चार जण प्रवास करीत होते. रशियाच्या वृत्तसंस्थांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे. अंतराळात सोडण्यात आल्यानंतर काही काळातच रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे ध्यानात आल्यामुळे हे इमर्जन्सी लॅन्डिग करण्यात आल्यामुळे रशियावर नाचक्कीची वेळ आली आहे.
या अंतराळ यानामध्ये अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे ऍलेक्‍सी ओव्चेनिन हे अंतराळवीर होते. त्यांना कोणत्याही दुखापतीशिवाय कझाकिस्तानमध्ये सुखरूपपणे या अंतराळयानातून सोडवण्यात आले आहे. आपत्कालिन बचाव यंत्रणेने आपले काम चोख बजावून या अंतराळवीरांना समुद्रकिनाऱ्यावर आणले. यानातील सर्व अंतराळवीर सुरक्षित आहेत, असे रशियाच्या “रॉसकॉसमॉस’ या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षापासून रशियाच्या अंतराळ संस्थेला सातत्याने काही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काही उपग्रह आणि अंतराळ यानेही नष्ट झाली आहेत. सोयुझ हे अंतराळ यान कझाकिस्तानमधील बैकोनोर येथून अवकाशात सोडण्यात आले होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)