व्हेनेझुएलामधून रशियाने तातडीने सैन्य काढून घ्यावे- ट्रम्प 

वॉशिंग्टन – रशियाने व्हेनेझुएलामधून तातडीने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी सूचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. व्हेनेझुएलाचे कडवे डाव्या विचारसरणीचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी अमेरिका लष्करी कारवाई करण्यासही मागे पुढे बघणार नाही, असा गर्भित इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. मादुरो यांच्या सरकारला धोका निर्माण होऊ नये, म्हणून रशियाने व्हेनेझुएलामध्ये सैन्य तैनात केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हेनेझुएलामधील घडामोडी या सर्वांच्या नजरेत भरल्या आहेत. तेथील राजवटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास ट्रम्प प्रशासन उत्सुक आहे.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांच्या जागेवर विरोधी नेते जुआन ग्युाडिओ हे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्‍त झाले आहेत. ग्युडिओ यांच्या पत्नी फॅबियाना रोसेल्स सध्या अमेरिकेच्या दौऱ्यवर असून ग्युडिओ यांना अमेरिकेसह अन्य 50 देशांचे समर्थन त्यांनी मिळवले आहे. मादुरो हे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असून तेथील जनतेला अन्न आणि औषधांसारख्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मात्र रशियाकडून मादुरो यांनाच अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला गेला आहे. तर अमेरिकेने ग्युडिओ यांना हंगामी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

रशियाने व्हेनेझुएलामधून सैन्य माघारी घेतलेच पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र रशियाने ट्रम्प यांची मागणी फेटाळून लावली आहे. उलट सिरीयामध्ये असाद यांची राजवट रशियावरच अवलंबून आहे. अमेरिका सिरीयामधून महिन्याभरापूर्वीच सैन्य मागे घेणार होते. असे असताना अमेरिकेचे सैन्य सिरीयामध्ये अजून काय करते आहे, असा प्रश्‍न रशियाच्या पररष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या मारिया झाकारोव्ह यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)