ऋषभ पंतची विक्रमांची हॅट्ट्रिक

सिडनी – नर्व्हस नाईंटीची दोन वेळेस शिकार झालेल्या ऋषभ पंतने भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आपले दुसरे कसोटी शतक झळकावले. त्याने आपल्या या शतकी खेळीचे श्रेय दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाला दिले आहे.

2018 साली इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केलेल्या पंतच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक जमा आहे. आज पंतने जाडेजाच्या मदतीने शतकी खेळी करत नर्व्हस नाईंटीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावून तीन नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यातील पहिला म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा ऋषभ हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. ऋषभ पंतने 189 चेंडूत नाबाद 159 धावा केल्या. त्याने 137 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

कसोटी कारकिर्दीतील ऋषभचे हे दुसरे शतक असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलेच शतक आहे. ऋषभ पंत याने या सामन्यात भारताचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा 12 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. सिडनी कसोटीत 159 धावा करणारा ऋषभ भारताबाहेर सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक ठरला आहे.

यापूर्वी धोनीने 2006 साली फैसलाबाद कसोटीत पाकिस्तानच्या विरुद्ध 148 धावांची खेळी केली होती. तर, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा पंत हा दुसरा सर्वाधिक तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. तो 21 वर्षांचा आहे. यापूर्वी, सचिन तेंडुलकर याने 18 व्या वर्षी दोन शतके ठोकली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)