ऋषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम

ऍडलेड – भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यष्टीमागे 6 झेल घेत महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. याअगोदर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका डावात सर्वाधिक झेल घेण्याचा भारतीय विक्रम धोनीच्या नावे होता.

त्याने 2008 मध्ये पर्थ कसोटीमध्ये यष्टीमागे 5 झेल घेतले होते. त्याचबरोबर 2014 मध्ये मोलबोर्न कसोटीमध्ये 4 झेल आणि एक यष्टीचीत केले होते. खास कामगिरीसह ऋषभ ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका डावात सहा झेल घेणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

-Ads-

ऋषभ पंतच्या अगोदरही अशी कामगिरी अन्य काही खेळाडूंनी केली आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका डावात सर्वाधिक 7 झेल घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्यारिडली जेकब च्या नावे आहे त्याने 2000 मध्ये मेलबॉर्न कसोटीमध्ये हा विक्रम नोंदवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
21 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)