#विशेष : हवामान बदल आणि उपासमारी (भाग 2)

-राजीव मुळ्ये (पर्यावरण अभ्यासक)

#विशेष : हवामान बदल आणि उपासमारी (भाग 1)

अर्धपोटी आणि उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकाच वर्षात हा आकडा दोन कोटींनी वाढणे मानवजातीला शोभणारे नाही. वातावरणीय बदलांमुळे झालेले परिणाम, शेतीची होत असलेली वाताहत हे अन्नटंचाईचे प्रमुख कारण ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना न केल्यास जलवायू परिवर्तनाशी अनुकूलन साधणे उत्तरोत्तर कठीण होत जाईल आणि उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या अशीच वाढत जाईल.

-Ads-

संयुक्त राष्ट्रांच्या सातत्यपूर्ण विकासाच्या उद्दिष्टांनुसार, अन्नसुरक्षितता ही मूलभूत गरज मानली गेली असून, अन्नामुळेच माणसाची कार्यक्षमता टिकून राहते आणि योग्य मानसिकता ठेवून तो काम करू शकतो. चांगले जीवन व्यतीत करू शकतो. खाद्य असुरक्षितता शून्य करण्याच्या उद्दिष्टाबरोबरच चांगल्या आरोग्याचेही उद्दिष्ट सातत्यपूर्व विकास धोरणात समाविष्ट करण्यात आले आहे.

योग्य आहार मिळाला तरच शिकण्याची, काम करण्याची आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता माणसात निर्माण होत असते. पोषणमूल्यात सुधारणा झाल्यास मुली, महिला आणि लहान मुलांच्या शिक्षणात सुधारणा होईल. लैंगिक भेदभाव कमी होईल. मुली आणि महिलांमध्ये विशेषत्त्वाने जाणवणारी ऍनिमियाची समस्या यामुळे कमी होईल. पोषणमूल्ययुक्त आहार मिळण्यासाठी साफसफाई आणि स्वच्छ पाण्याचीही गरज असते. त्यामुळे या दोन गोष्टीही साध्य करणे सातत्यपूर्ण विकासात अभिप्रेत आहे. आहाराद्वारे उत्तम पोषणमूल्ये मिळाल्यास मासे पकडण्यासाठी नद्या आणि समुद्रावरील लोकांचे अवलंबित्व कमी होऊन सागरी जीवांची संख्या वाढेल.

गरीब देशांमध्ये पोषणमूल्ये मिळविण्यासाठी लोक झिंगे, खेकडे आणि मासे यावर अवलंबून असतात. चांगले भोजन मिळविण्यासाठी शेतीचा विस्तार करावा लागेल आणि त्यामुळेच हिरवाईत वाढ होईल. त्यामुळे कार्बनडाय ऑक्‍साइडचे प्रमाण घटेल, असेही सातत्यपूर्ण विकासाच्या अजेंड्यात गृहित धरण्यात आले आहे. पोषणमूल्यांनी युक्त आहारामुळे लोकांचे वजन कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांना रक्‍तदाब, मधुमेह आणि थायरॉइड यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार कमी प्रमाणात होतील.

जलवायू परिवर्तनाच्या संकटापासून मुक्ती मिळविण्याच्या दृष्टीने आज आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे अनुभवाचीही आपल्याकडे कमतरता नाही. जागतिक समुदाय, सरकारे आणि शेतकरी यांच्या एकत्रित सहयोगातून बरेच काही घडू शकते. मात्र, असा सहयोग घडवून आणणे हेच मुळात एक मोठे आव्हान आहे.

अर्थात, तो घडवावा लागेल आणि कसून प्रयत्न करावेच लागतील, कारण आताच जर योग्य पावले उचलली नाहीत, तर जलवायू परिवर्तनाशी अनुकूलन साधणे आपल्याला दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या कृषी आणि अर्थव्यवस्था विभागाचे म्हणणे आहे. अर्धपोटी आणि उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांची संख्या जगभरात वाढत असताना आणि त्याला जलवायू परिवर्तन कारणीभूत ठरत असताना प्रत्येक नागरिकाची जबाबदारी वाढते आणि ती प्रत्येकाने
ओळखायलाच हवी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)