#हलके_फुलके : पुरूष दिन (भाग 1)

-सुजाता निंबाळकर

शनिवारी सकाळी सकाळी आबुरावाच्या हातात ताजा पेपर पडला आणि आबुराव पेपरमध्ये डोळे गाडून लेख वाचू लागला.
“”पुरुष दिन…. प्रा. मोरे सर.”

आबुरावाने संपूर्ण लेख वाचला आणि त्याला स्वतःचंच प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसलं. त्याच्या अंगात शक्तीचा संचार व्हावा, तसा संचार झाला. आणि तो पुरताच बदलून गेला. तो विचार करू लागला. पुढच्या आठवड्यात स्त्री दिन अशी कथा वासंतीने लिहिली पाहिजे. आबुराव झटकन माळ्यावर चढला आणि आपली धूळखात पडलेली बंदूक साफ करू लागला. तेवढ्यात वास काढीत वासंती आलीच.

“”हे काय ध्यान… ही काय खेळण्यातील बंदूक नाही. पण ती कशासाठी साफ करताय.”

“”कशाला म्हणजे काय. मी बिबट्याच्या शिकारीला निघालोय.”

“”बिबट्याची शिकार…? अहो संध्याकाळी मच्छरांच्या मागे बॅट घेऊन पळता, तर बॅटमध्ये एक मच्छरही सापडत नाही आणि आज अचानक बिबट्याची शिकार? स्वप्नात काय विरप्पन आला होता की काय!”

“” कशाचा परिणाम ते तुला नाही कळायचं.” “”पण तुम्हाला ही अवदसा का आठवली.”

“”या अवदसेपेक्षा ती अवदसा परवडली.” असे म्हणून आबुरावाने झटकन बंदूक वासंतीच्या मानेला लावली. वासंती खूप घाबरली. तिलाही समजेना, अचानकच झोपलेला वाघ डरकाळ्या का फोडू लागला ते. आबुरावाने गर्जतच वासंतीला विचारले.

“”वासंते… आजपासून घरातली कामं तू करायचीस. तुझं हिंडणं, फिरणं बंद. पोरांचा अभ्यास तू घ्यायचा. धुणी, खरकटी तू काढायची. संध्याकाळी बरोबर 7 च्या काट्यावर जेवणाचं ताट मला आलं पाहिजे समजलं…”

“”होय समजलं… सगळी कामं मीच करणार.” वासंती कापऱ्या आवाजात बोलली.”
“”आज कापरं का भरलंय तुला? मी कसा बिन कापता काम करीत होतो. तसंच तू करायचं. मी सांगणार… तू ऐकणार… कबूल.”’

“”कबूल.” “”आता मी शूरासारखं जीवन जगायचं ठरविलंय समजलं…”

“”पण बंदूक बाजूला घ्या. त्या बंदुकीनं तुम्ही काय करणार.”

“”काय करणार म्हणजे… तो जंगलातून पळालेला बिबट्या. त्याने किती माणसं खाल्ली.”

“”म्हणजे तुम्ही आता माणसांचं मांस खाणार? कोंबडी न बकरंच एवढं महाग, तर माणसांचं मांस म्हणजे…”

“”चूप बस. तुझी अक्कल पाजळू नको. त्या माणसं खाल्लेल्या बिबट्यालाच मी मारणार आहे.”

“”पण तो मॅनइटर आहे. तुम्ही कशी काय त्याची शिकार करणार.” “”कसे म्हणजे काय विचारते. बोंबील चिरताना डोकं कसं पिरगळून काढायचो न चिरता अगदी तसंच त्याचं मुंडकं पिरगळणार.” “”पण त्यानं समोरून झडप घातली तर?”

“”तर मी त्याच्या पाठीमागून वार करीन.”””वार कधीही पाठीमागून करायचा नसतो. शत्रू बेसावध असल्यावर त्याच्यावर वार करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे.”

“”कुणाला भ्याड म्हणते… मला…? तू बिबट्याच्या बाजूने आहेस का माझ्या बाजूने?”

“”तुमच्याच बाजूने पण तुम्हाला डावपेच शिकवते.” “”तुझ्याकडून मी डावपेच शिकलोच आहे. ते आता उपयोगी पडतील. कशी तोंडावर पडल्यासारखी बघतेय.”

#हलके_फुलके : पुरूष दिन (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)