#हलके_फुलके : पुरूष दिन (भाग 2)

-सुजाता निंबाळकर

#हलके_फुलके : पुरूष दिन (भाग 1)

शनिवारी सकाळी सकाळी आबुरावाच्या हातात ताजा पेपर पडला आणि आबुराव पेपरमध्ये डोळे गाडून लेख वाचू लागला.
“”पुरुष दिन…. प्रा. मोरे सर.”

“”पण बिबट्या आलाच नाही तर…” “”कसा येणार नाही तो… प्यायला तरी येईल ना…” “”म्हणजे तुम्ही काय दारूपार्टी ठेवली का वनात.

दारूला कंटाळले म्हणून तर घरचं काम लावलं. कोणता लेखक भेटला आणि माझ्या नवऱ्याला अवदसा आठवली.”

“”अगं तो दारू पिण्यासाठी नाही, तर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येईल. मग मी मचाणावरून झटकन बंदूक मारीन. बिबट्या खाली पडल्यावर वरून उडी मारीन. मग सरकार मला बक्षीस देईल. किंवा वनखात्यात नोकरी.”

“”जणू काही शर्टाच्या बाहीत हात घातल्यासारखाच बोलताय.””पण बिबट्या मेला आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर…”

“”पण तू शिकार करण्याआधीच पाय का मागे ओढतेस. मला तुला तोंडावर पाडायचंय का. पण तुला हे माझं शौर्य कसं खुपलं. काट्यासारखं रुतत असेल मनात.”

“”पण मी तुम्हाला कधी बंदूक चालवलेली पाहिली नाही. त्यामुळं काळजी वाटते. बंदूक चालवून नेम चुकला… बिबट्याने हल्ला केला तर…”

“”तर काय तर. मला बंदूक चालवायला लहानपणापासूनच येती. पण लग्न झाल्यापासून सगळंच विसरून गेलो होतो.”

“”पण तुमची आई तुमच्या बंदुकीची गंमत सांगत होती.” “”काय… काय सांगितलं तिनं?” “”हेच की गावात पिसाळलेलं कुत्रं आलं होतं. त्यावेळी तुम्ही त्याच्यावर नेम धरला. आण पोलिसाचाच पाय उडवला.” “”उडवला काय, धूळ उडवल्यासारखी सांगतेय. त्यावेळी माझी चुकी नव्हतीच. मी कुत्र्यावर नेम धरला तेवढ्यात पोलीस शिंकला आणि कुत्र्यावरचा नेम चुकून पोलिसावर बसला. त्यामुळे चुकी झाली.”

“”बरं ठरवलंच आहे तर जा. आता तुम्ही कधीही दीन दिसणार नाहीत. तुमचं शौर्य जागं झालंय. तुम्ही शिकारीला जाच. जगालाही कळू द्या माझा नवरा शेळी नाही, तर गर्जणारा वाघ आहे वाघ. पण जरा जपून… बेस्ट ऑफ लक. निघा आता.”

“”सदैव सैनिक पुढेच जायचे न मागती तुवा कधी फिरायचे.” गाण्याच्या ठेक्‍यावरच आबुराव संचलन करीत निघाला. बरोबर बरचसं साहित्य देखील घेतले आणि वासंतीकडे पाहत.

“”वासंती तुझा आशीर्वाद शिदोरी म्हणून घेऊन चाललोय पुढील प्रवासात उपयोगी पडेल.” आणि चालत असताना थांबला.

“”वासंती… ये वासंती जरा इकडे ये ना, ते पाटलाच्या दारात झोपलेलं कुत्र तेवढं हान. मी शिकारीला निघालोय.” आता वासंती चांगलीच भडकली, “”शिकारीला चाललात आणि कुत्र्याला घाबरताय. जळलं मेलं लक्षण. आणा ती बंदूक इकडं. घरात भांडी घासायची पडल्यात. सैपाक करायचा पडलाय. खरकटं काढ्यचंय.”

“”बरं बरं ओरडतीस कशाला उरकून देतो सगळं” आणि वासंतीने पुन्हा एकदा बंदूक आबुरावच्या खांद्याला लावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)