नायिका आणि ‘खाकी’ (भाग 3)

अलीकडील काळात पोलीस दलामध्ये महिलांचे प्रमाण वाढताना दिसत असले तरी हिंदी चित्रपटांमध्ये खाकी वर्दीतील नायिका तशी अभावानेच दिसली. त्यातही साचेबद्धपणा अधिक दिसून आला. नायक पोलीस अधिकाऱ्याची जशी भूमिका होती तशीच ती अभिनेत्रींनाही मिळाली. महिला पोलीस अधिकाऱ्यांना खऱ्या आय़ुष्यात ज्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांना कोणत्या वातावरणात काम करावे लागते, कामाच्या वेळेत त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे कोणत्याच चित्रपटात गांभीर्याने दाखवले गेले नाही.

पण बहुतांश चित्रपटांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची पारंपरिक भूमिकेपेक्षा फार प्रगती झालेली नाही. “धूम 2′ मध्ये बिपाशा बसूचे रूप ग्लॅमरसच अधिक होते. “समय’ मध्ये सुष्मिता सेन, “डी डे’ मध्ये हुमा कुरेशी, “चक्रव्यूह’मध्ये इशा गुप्ता आणि “मिस्टर जो भी करवाल्हो’ मध्ये सोहा अली खान यांना खाकी गणवेशात दाखवताना दिग्दर्शकांची त्यांच्याकडून सेक्‍स अपीलची अपेक्षाचा अधिक होती. त्यामुळे या नायिकांनी तंग खाकी गणवेशात अंग प्रत्यंगाचे दर्शन करण्यावरच जास्त भर दिला गेला.

महिला पोलीस अधिकाऱ्यांना खऱ्या आय़ुष्यात ज्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांना कोणत्या वातावरणात काम करावे लागते, कामाच्या वेळेत त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे कोणत्याच चित्रपटात गांभीर्याने दाखवले गेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी हरियाणातील एका मंत्र्यांने एका आयपीएस अधिकाऱ्याला खुलेआम लाथाडले त्यावरूनच महिला पोलीस अधिकाऱ्यांची सामाजिक आणि राजकीय अवस्था काय आहे, हे समजते. चित्रपटांतून मात्र असे कोणतेही चित्रण केले जात नाही. चित्रपटात अगदी उलट चित्रीकरण केले जाते. महिला पोलीस अधिकारी कोणत्याही राजकीय नेत्याचा अपमान करताना दाखवली जाते.

“तेजस्विनी’ या चित्रपटातील विजयाशांतीने साकारलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका त्यामानाने यथार्थ होती. अन्यायाचा मुकाबला करताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याचे चित्रण त्यात केले होते. 1988 मध्ये निर्माण झालेल्या “जख्मी औरत’ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारलेल्या नायिकेला आपल्या साहसाची मोठी किंमत चुकवावी लागते.

तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो आणि ती व्यक्तिगत पातळीवर सूड न घेता ती बलात्काऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्या सारख्या बलात्कारपीडितींची मदत घेऊन वेगळ्याच पद्धतीने गुन्हेगारांना शिक्षा देते. अशा प्रकारच्या अ-नाटकी आणि वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या भूमिका जेव्हा पडद्यावर साकारल्या जातील तेव्हा कदाचित खाकीतील स्री लोकांना अधिक जवळची वाटेल.

नायिका आणि खाकी (भाग 1)   नायिका आणि खाकी (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)