#क्रींडागण : भारतीय कबड्डीवर महाराष्ट्राची मोहर

आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी यंदा अनपेक्षित यश मिळवले. त्यातही महिला खेळाडूंनी वरचष्मा ठेवला. भारताला मिळालेल्या एकूण पदकांपैकी सत्तर टक्के पदके ही महिला खेळाडूंनी मिळवली आहेत. आता जपानमध्ये होणारे 2020 ऑलिंपिक आता आपल्या खेळाडूंचे प्रमुख लक्ष्य आहे. 

भारतीय पुरुष संघ कबड्डीच्या आठव्या सुवर्ण पदकाच्या शर्यतीत अपयशी ठरला. मात्र महिलांनी रौप्य पदकाला गवसणी घातली. महिलांच्या अंतिम लढतीत भारताची कर्णधार पायल चौधरी आणि महाराष्ट्राच्या दोन उदयोन्मुख खेळाडू सायली करपाळे आणि सोनाली शिंगटे यांच्या अफलातून चढाईवर भारताने रौप्य पदक मिळवले.

इराणच्या खेळाडूंच्या सरस खेळासमोर भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर कबड्डीत इतकी नामुष्की आली नसती. मात्र प्रो कबड्डी लीगमुळे परदेशी संघांनाही या खेळाची सर्वागीण माहिती झाल्यामुळे ते तुल्यबळ बनले आहेत हे देखील मान्य करावेच लागेल.

जपानमध्ये होणारे 2020 ऑलिंपिक आता आपल्या खेळाडूंचे प्रमुख लक्ष्य आहे. तेथील वातावरणात आपले खेळाडू कसे खेळतात, आणि परदेशी संघांच्या तोडीसतोड खेळ कसा करतात यावरच भारतीयांचे यशापयश अवलंबून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)