#हलके_फुलके : गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग १)

-सुजाता निंबाळकर

रावणगावची जत्रा जवळ आली आणि लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. बन्या तसा जरा चुकारच. बायकोचीही कटकट नाही. त्यातच त्याला अचानक घेरी आल्यासारखे झाले. बन्या नुसताच जमिनीकडे पाहत बसू लागला. ना खाईना ना पेईना. शेवटी त्याच्या आईने त्याला मांत्रिकाकडे न्यायचे ठरविले. पण मांत्रिक दुसऱ्याच कामामध्ये असल्यामुळे पत्ता देऊन मांत्रिकालाच गावात बोलायचे ठरविले. त्यासाठी यात्रेचे औचित्य साधून गोडबाबांना गावात बोलवायचे ठरविले.

यात्रेचा दिवस उजाडला. भविष्य सांगणारे बाबा येणार… त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होणार. ज्यांचे दर्शन दोन दोन तास मिळत नसे, असे गोडबाबा गावात 1 तासच थांबणार असल्याने प्रत्येकाने आपलीच समस्यांची मोठी लिस्ट तयार केली.

एक पांढरी शुभ्र गाडी गावाच्या वेशीवर येऊन थडकली. गोडबाबांना मिरवत वेशीपासून गावच्या मंदिरापर्यंत आणायचे होते. झांजपथक घुमू लागले. त्याचबरोबर बॅंडही आणला होता. गाण्याला सुरुवात झाली. “बाई मी लाडाची गं लाडाची…’ गडी माणसांनी असा जो ठेका धरला की बॅंड पुढेच जाऊ देईनात. त्यात काहींनी थोडी आकाबाई घेतली त्यामुळे चांगलेच सराळले होते. कधीही न नाचणारेसुद्धा नागोबासारखे डोलत होते.

गोडबाबा हे दृश्‍य रथातून बघत होते. त्यातच एकच गाणं ऐकून गोडबाबा ओरडले “कोंबडी लावा… कोंबडी लावा’ एकाने जिवंत कोंबडी पकडून आणली आणि रथाच्या चाकाजवळ लावली. बाकी लोक मात्र नाचण्याच्या तालातच होते. ठेका चुकला तरी दगड घेऊन बॅंडवाल्यांवर उगारीत होते. शेवटी बाबा रथातून उडी मारून खाली आले. त्यांनी हातातील पिसाऱ्यानेच लोकांना चोपायला सुरुवात केली. जी जास्त झिंगताना दिसली त्यांना बाबा खवूनच टोला देत होते.

जेवढी सापडली तेवढ्यांना बाबांनी सडकून काढले. आणि गर्दीतून वाट काढत मंदिरात पोहोचले. आता मंदिरामध्ये कलशपूजनाचा कार्यक्रम होता. पण बाबांच्या जवळच कुणी येईना. फोटोग्राफर फोटो काढायला आलेला, पण बाबांच्या जवळचा पिसारा बघून फोटो न काढताच पळू लागला.” शेवटी बाबांनी त्याला पकडलेच. फोटोग्राफर आणखीनच घाबरला.

“”बाबा…. तुम्ही मला मारू नका. मला माराची भिती वाटते.”””अरे तुला मी मारण्यासाठी आलो नाही. तुला फोटो काढायला सांगण्यासाठी आलोय. मग पूजेचा विधी सुरू झाला. फोटोग्राफर खटाखट खटाखट फोटो काढू लागला. पुढे पुढे करायला कोण गेले तर बाबा फटकन पिसाऱ्याचा रट्टा देऊन नाचायलाच लावीत होते.

पूजेचा कार्यक्रम असूनही बाबांच्याजवळ कुणी जायला धजवेना. बाबांच्या समोरच काही अंतरावर बन्या जीव मुठीत धरून बसला होता. त्याचे लक्ष पूजेत अधिक नव्हतेच. तो सारखा बाबांच्या पिसाऱ्याकडेच बघत होता. बाबांची नजर बन्यावर पडली.

गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)