#हलके_फुलके : गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग २)

गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग १)

-सुजाता निंबाळकर 

रावणगावची जत्रा जवळ आली आणि लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. बन्या तसा जरा चुकारच. बायकोचीही कटकट नाही. त्यातच त्याला अचानक घेरी आल्यासारखे झाले. बन्या नुसताच जमिनीकडे पाहत बसू लागला. ना खाईना ना पेईना. शेवटी त्याच्या आईने त्याला मांत्रिकाकडे न्यायचे ठरविले. पण मांत्रिक दुसऱ्याच कामामध्ये असल्यामुळे पत्ता देऊन मांत्रिकालाच गावात बोलायचे ठरविले. त्यासाठी यात्रेचे औचित्य साधून गोडबाबांना गावात बोलवायचे ठरविले.

बाबांनी त्याला इशारा करून जवळ बोलविले. बन्या जीव मुठीत धरून बाबांच्याजवळ आला आणि मोठ्यानेच ओरडला. “”बाबा मला नका मारू. मी नाही दारू पिलो. बायकोला व्यवस्थित सांभाळतो. तुमचा भक्त आहे.” आणि अंग चोरून चोरून चोळू लागला. दहा मिनिटे बन्या अंगच चोळीत होता. परंतु प्रतिसाद काहीच मिळेना म्हणून बन्या पुन्हा हळूच बाबांकडे पाहू लागला. तसे बाबा गालातल्या गालात खुदकन हसले.

“”अरे बन्या तुला मी मारीत नाही. तुला माझ्याजवळ बसायला बोलावले आहे.” “”मला तुमच्याजवळ. पण मला त्या पिसाऱ्याची भीती वाटते तो पिसारा तिथे कोपऱ्यात ठेवून येऊ का?”””मग दुसरीकडे ठेव आणि तू माझ्याजवळ ये. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.”

बन्या बाबांच्या जवळ बसला. तसा इतर लोकांनाही बन्याचा हेवा वाटू लागला. बन्याने बाबांना हळूच विचारले.””तिथं तो बाज्या बसलाय तो माझ्याच बरोबर आलाय त्याला तेवढ बोलवू का?” “”होय बोलाव.” बन्याने बाज्याला इशारा केला तसा चटकनच बाज्या बन्याच्या मागे येऊन बसला. पुन्हा बाज्याच्या बरोबर आलेला शिरप्या त्याच्या मागे बसला आणि हां… हां…. म्हणता म्हणता भली मोठी लांबलचक रांग तयार झाली.

सगळा गाव गोडबाबांच्या सहवासात रमला. ज्याची काय इच्छा असेल ती इच्छा एका कागदावर लिहून बाबांच्या पुढे ठेवत होते. बाबा त्याच्यावर उपाय सांगत होते. सर्व गावाचे पाय जणू बाबांच्या भोवतीच खिळले होते. गावात चिटपाखरू देखील उरले नव्हते. इकडे आठ दहाजणांनी घरोघर जाऊन घरं धुवून घेतली.

पैसाआडका, दागदागिने, कपडे, तांब्या पितळेची भांडी भरभरून सर्व सामान गाडीत टाकले. गाडी पार गावाच्या वेशीवर ठेवली होती. गोडबाबांनी आपले काम केले. सहकाऱ्यांनी आपले काम केले. गावकऱ्यांनी आपले केले. सर्वांच्या आनंदाला भरतं आलं.

पुन्हा गावात येण्याविषयी सर्वांनी बाबांना विनंती केली आणि जड पावलाने लोक आपापल्या घरी गेले. घरी जाऊन बघतात तर चोरट्यांनी घर साफ केल्यामुळे घरोघर मोठाच कल्लोळ माजला. गोडबाबा मात्र गोड प्रसाद देऊन गावातून पसार झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)