#स्मरण : पोस्ट बघा पोस्ट…

-योगिता जगदाळे

गंमत म्हणून केलेल्या काही गोष्टी मोठा विचार करायला लावतात. व्हाट्‌सऍपवरही अशा गंमत म्हणून टाकलेल्या गोष्टी विचारात पाडतात, विचार करायला लावतात-आणि त्यावर इतरांनी विचार करावा अशी अपेक्षा मनात जागवतात. आता ही एक पोस्ट व्हाट्‌सऍपवर मला चार-पाच वेळा आली. काही ग्रुपमधून तर ती सतत फिरत होती. ही सारी रचलेली गोष्ट, गंमत म्हणून केलेली, पण गंमत म्हणून वाचणाराला ती एकदा हसून झाल्यावर गंभीर करणारी. नुसती गंभीर नाही, तर काहीशी हतबल करणारी, ती पोस्ट व्हाट्‌स ऍपवर आली होती काही दिवसांपूर्वी.

ती साधरण पणे अशी होती-शब्दश: मला आठवत नाही, पण तिचा मतितार्थ असा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना विचाराले, तुमची अमेरिला इतकी प्रगत कशी काय? सर्वव बाबतीत. यावर अमेरिकेचे अध्यक्ष (यांने नाव दिले नव्हते. कदाचित ओबामा असतील, कदाचित ट्रम्प असतील. ओबामा म्हणाले असतील “ओ बाबा! ही सारी इंडियाची कृपा. ते कसे काय? बुचकळ्यात पडलेल्या मोदींनी विचारले. आम्ही तर तुमच्यापेक्षा किती तरी मागे आहोत “” तेचे ते.” ओबामा म्हणाले, दोन्हीचे कारण एकच. अमेरिका अतिशय प्रगत, पुढे आणि भारत मागे याचे कारण असे, की तुम्ही लोक आरक्षणाने नोकऱ्या देत बसता; त्यामुळे सारे टॅलंट येते अमेरिकेची सेवा करायला, अमेरिकेला पुढे न्यायला.

यावर मोदींची प्रतिक्रिया काय ते काही पोस्ट मध्ये दिले नव्ह्ते. पण जी तुमची आमची, तीच त्यांची असणार.
अशाच नाना पाटेकरच्याही काही पोस्ट डोळ्यात अंजन टाकणाऱ्या असतात. काल एकदम तीन पोस्ट आल्या होत्या- नानचे चित्र आणि सोबत चार ओळी-

कडवा सच-

हम एक ऐसे देश वासी है, जहां पीएचडी/ग्रॅज्युएशन/इंजिनीयरिंग/डॉक्‍टरी केलेला माणूसही मॅट्रिक नापास माणसाला मत देऊन मत देऊन त्याच्याकडून चांगल्या भविष्याची आशा बाळगतो.

शिक्षा में राजनीती 100 टक्के

राजनीती में शिक्षा 00 टक्के वाह रे मेरे देश का सिस्टम…..
बस यही एक कारण है की….राजनीतीमें कचरा भरा है
और देशका टॅलंटेड इन्सान विदेश में जमा पडा है…… सहमत हो, तो आगे बढाओ

किसी नेतापर चप्पल- अंडा फेंकने पर तुरंत शख्स को गिरफ्तार कैया जाता है,
लेकिन भारतीय सेनापर पत्थर बाजी करने वालों को छूट क्‍यों?

खरं तर या तीनही पोस्टमध्ये तसे काहीही कनेक्‍शन नाही, पण एकत्र करून पाहिल्या तर त्यात मोठे सार भरले आहे देश मागे पडण्याचे खरे कारण आहे. अर्थात हे 100 टक्के सत्य नसेलही ,मग पण सत्याच्या जवळ जाणार आहे. जवळ नेणारे आहे..
फक्‍त आम्ही त्याकडे बघत नाही, गंभीरपणे विचार करत नाही. पुढे जात नाही हाच दोष आहे.
कोणीतरी बधील, आपल्याला काय त्याचे?अशी एक पळपुटी धारणा आहे आपल्यात. तीच नुकसानदायक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)