#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग २)

-अश्विनी महामुनी

कालचीच गोष्ट. मी बसने प्रवास करत होते. बसला गर्दी होतीच. बसला गर्दी नसते कधी हा एक संशोधनाचा विषय आहे. प्रयत्ने वाळूचा कण रगडिता तेलही गळे : .. असे काहीसे एक सुभाषित म्हणा वा कवितेचा चरण म्हणा आहे.

जर आज तुकाराम महाराज असते, तर पुत्र नव्हे, कन्या व्हावी ऐसी असे ते अभिमानाने म्हणावे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

आज कोणत्याही क्षेत्रात मुली मागे नाहीत. असे एकही क्षेत्र नाही, ज्यात मुलींनी बाजी मारलेली नाही. काही दिवसांपूर्वी तेलंगणातील एक बातमी वाचली आणि तुकारामाच्या ओळी आठवल्या.

तेलंगणातील एक रॅली. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या एका बैठकीच्या बंदोबस्तास डीसीपी उमा महेश्‍वर राव होते. तेवढ्यात तेथे एक आयपीएस अधिकारी आली.  एसपी सिंधु शर्माः..  डीसीपी उमा महेश्‍वर राव यांनी एसपी सिंधु शर्मा यांना पाहिले अणि खाडकन कडक शिस्तीत त्यांना सॅल्यूट मारला.

हे पाहणाऱ्या लोकांना मोठी गंमत वाटली. त्यांना हसू आवरणे मोठे कठीण झाले. कारण डीसीपी उमा महेश्‍वर राव हे एसपी सिंधू शर्मा यांचे वडील आहेत. आपल्यापेक्षा वरच्या पोस्टवर पोहोचलेल्या मुलीला सेल्यूट मारताना त्यांचे मन अभिमानाने भरून आले असेल यात काही शंका नाही.

डीसीपी उमा महेश्‍वर राव हे 30 वर्षंच्या सेवेनंतर पुढील वर्षी निवृत्त होणर आहेत. सब इन्स्पेक्‍टर म्हणून पोलीस सेवेत सुरुवात केलेल्या उमा महेश्‍वर राव यांना डीएसपी होण्यास 30 वर्षे लागली तर सिंधूने सुरुवातच एसपी बनून केली आहे.

तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या जाहीर सभेत पिता-पुत्री ड्यूटीवर असताना आमने सामने आले होते. प्रथमच. आपल्या वरिष्ठ असलेल्या कन्येला सॅल्यूट ठोकताना डीएसपी उमा महेश्‍वर राव यांना किती अभिमान वाटला असेल याची कल्पना आपण करू शकत नाही.

त्यांनी मनातल्या मनात नक्की म्हटले असेल की- ‘पुत्र व्हावा ऐसा नाही-कन्या व्हावी ऐसी’.

#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग १)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)