#आगळे वेगळे : गोकुळाष्टमी, दहीहंडी आणि शुध्द भावना…( भाग २)

#आगळे वेगळे : गोकुळाष्टमी, दहीहंडी आणि शुध्द भावना…(भाग १)

-अनुराधा पवार

गोकुळाष्टमी आली, की अनेक आठवणी मनात पिंगा घालू लागतात. कृष्ण हा आम्हा भारतीयांचा अत्यंत लाडका देव. त्याच्या दह्यादुधाची चोरी करणाऱ्या कान्हापासून ते रास रचणाऱ्या गोविंदापासून ते गीता सांगणाऱ्या योगेश्‍वर कृष्णापर्यंत अनेक रूपे आमच्या हृदयात ठाव मांडून बसली आहेत.

तेव्हा माझी आई वर्षाचे लोणचे, खाराची मिरची, सांडगे, पापड, कुरडयापापड्या एकदमच करून ठेवायची. तोंडावर कापड बांधलेल्या लोणच्याच्या, खाराच्या मिरचीच्या बरण्या कपाटात अगदी ऐटीत बसलेल्या असायच्या. तेव्हा भाजीपाला रोजच्या रोज दारावर यायचा विकायला. दुधाचा रतीब असतो, तसा भाजीपाल्याचा सुद्धा रतीब असल्यासारख्या भाजीवाल्या रोज भाजी आणून देत आणि मिरच्या-कोथिंबीर या गोष्टी तेव्हा विकत घ्यायची पद्धतच नव्हती. भाजीपाला घेतला, की मिरच्या-कोथिंबीर त्याबरोबर आपोआप मिळायची.

माझ्या भावाने आणलेला दहीहंडीच्या मडक्‍याचा तुकडा मोठ्या आस्थेने दूधदुभत्याच्या कपाटात दहीदुधाच्या कप्प्यात विराजमान व्हायचा आणि काय असेल ते असो. आमच्या घरात दूधदुभत्याची कधीही कमतरता पडली नाही. कारण काहीही असो पण आम्हा सहा भावंडांना तेव्हा दररोज दूध मिळायचे प्यायला, खायला दही मिळायचे आणि आठ-पंधरा दिवसांनी आई घरीच तूप करायची, तेव्हा भाकरीवर लोण्याचा गोळाही मिळायचा भलामोठा. त्या लोण्याची चव काही आजच्या अमूल किंवा कोणत्याच “बटरला येत नाही.

आणि खरं सांगायचे तर त्यावेळच्या निरशा दुधासारखे दूध तरी आजकाल कोठे मिळते? दुधात पाणी घालणे म्हणजे तेव्हाचे गवळी पाप समजत असत. आपल्या मुलाबाळांना दूध लागते, तसेच आपल्या गिऱ्हाईकाच्या मुलांनाही लागते. तेव्हा त्यांनाही चांगलेच दूध द्यायचे ही भावना असायची आणि खरवसाचे दूधही कधी विकत घ्यायला लागायचे नाही.

लहानपणी आई-वडिलांच्या राज्यात जेवढे दूधदुभते आणि खरवसही खाल्ला ना, तेवढा आणि तसा पुढच्या आयुष्यात नाही खाल्ला. तेव्हासारखे निरसे दूध आता राहिले नाही आणि निरशी-सात्त्विक मने, शुद्ध निरपेक्ष भावनाही राहिल्या नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)