विचार : शोध स्वत:चा (भाग 2)

विचार : शोध स्वत:चा (भाग 1)

-अमोल भालेराव

तिकीट-तिकीट, चला! पुढे सरकत राहा.’ कंडक्‍टर बसमध्ये मोठमोठ्याने ओरडत होता. ‘एक डेक्कन’, असं बोलून एक तरुण बोलत होता, तेवढ्यात पुढे खड्डा असल्याने ड्राइव्हरने अचानक ब्रेक दाबल्याने त्या तरुणाचा तोल जाऊन पुढे उभे असलेल्या गृहस्थांना धक्का लागला. ‘नीट उभा राहता येत नाही का? पाकीट-बिकट मारायचा तर विचार नाही?

माणूस म्हणून जगताना आणि या समाजात वावरताना आपण एकमेकांना या बाहेरच्या चेहऱ्याने ओळखत असतो. एकमेकांविषयी वेगवेगळे तर्क बांधतो. आपल्या या चेहऱ्याला खूप लोकांनी ओळखावं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी असं कोणाला नाही वाटत? काही दिग्गज आणि विख्यात चेहरे असे पण आहेत की, ज्यांचं वलय आपल्या भोवती कायमच राहतं.

एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांच्या बाहेरच्या चेहऱ्याने ओळख निर्माण केलेली असते ती, पण ती टिकून राहते ती त्यांच्या आतील खऱ्या चेहऱ्यानेच. जो सतत आरशात न्याहाळतांना बाहेरच्या चेहऱ्याला बजावत असतो, मला कुठे डाग नको लागू देऊस…!

समोरच्याचं निरीक्षण आणि परीक्षण करणं तस सोप्पंच! नाही का? पण तेच स्वतःच्या बाबतीत आपण स्वतः नको का करायला? स्वतःचा शोध नको का घ्यायला? काही उणिवा असतील तर त्या तरी उमगतील. इतरांनी सांगायची वाट कशाला पाहायची? स्वतःच त्या बाजूला सारून पुढे जाता येईल.

आपल्या आत चांगुलपणा असेल तर माणूस म्हणून अधिक चांगलं कसं होता येईल, हेही समजेल. काही असामान्य ज्ञात असेल तर आयुष्याला एक वेगळी कलाटणी देता येईल. आत कुठे, कशाची तरी भीती दडली असेल तर तिला एकदाची बाहेर ओढून फेकून तरी देता येईल….!

आपण जेव्हा अंतर्मुख होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वतःचा शोध लागतो. आपल्या आतच जे दडलेलं असतं ते नव्याने आपल्याला गवसतं.

सर्कशीतील जोकरला पाहून आपल्याला खूप हसायला येतं. त्याच्या चेहऱ्यावरची रंगरंगोटी, भलं मोठं नाक, ओठांच्या बाजूने ब्रशने काढलेली हसरी छटा. त्याच्या बाहेरच्या चेहऱ्याने संपूर्ण रूपच बदललेलं असतं. तो खूप हसवतो आपल्याला. अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत. त्याचा आतला चेहरा पण असाच असेल का? कुणास ठाऊक. कदाचित असेलही, कदाचित नसेलही. खरं काय हे त्यालाच माहीत. ..!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)