विचार : शोध स्वत:चा (भाग 1)

-अमोल भालेराव

तिकीट-तिकीट, चला! पुढे सरकत राहा.’ कंडक्‍टर बसमध्ये मोठमोठ्याने ओरडत होता. ‘एक डेक्कन’, असं बोलून एक तरुण बोलत होता, तेवढ्यात पुढे खड्डा असल्याने ड्राइव्हरने अचानक ब्रेक दाबल्याने त्या तरुणाचा तोल जाऊन पुढे उभे असलेल्या गृहस्थांना धक्का लागला. ‘नीट उभा राहता येत नाही का? पाकीट-बिकट मारायचा तर विचार नाही?

चेहऱ्यावरून पाकीटमारच दिसतोस.’ असं ओरडून ते गृहस्थ पुढच्या स्टॉपला उतरले. तो तरुण माझ्या शेजारच्या मोकळ्या सीटवर येऊन बसला. वाढलेले केस, दाढी, अंगात ढगळ शर्ट, जीन्स, डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि पाठीवर सॅक. मी त्याला न्याहाळताना तर्क बांधत होतो, खरंच का हा पाकीटमार असेल? नसेल बहुतेक, मी मनातल्यामनात म्हटलं.

-Ads-

त्याची पण नजर माझ्यावर पडली, तो गालातल्या गालात हसत असल्यासारखं मला जाणवलं. मी त्याला विचारले, ‘तुला आता ते गृहस्थ पाकीटमार बोलले, त्याचं तुला वाईट नाही वाटलं?’ तो तरुण दिलखुलासपणे हसून बोलला, ‘मित्रा, ती व्यक्ती मला काही मिनिटांपासून ओळखते, पण मी मात्र स्वतःला माझ्या जन्मापासून ओळखतो.

मी कसा आहे हे मला चांगले माहिती आहे आणि म्हणून मी त्यांचं बोलणं तिळमात्रही मनाला नाही लावून घेतलं. मी सिद्धार्थ, एक चित्रकार आहे. कधी भेटलोच पुन्हा योगायोगाने तर ओळख असू दे’, एवढं बोलून तो पुढच्या स्टॉपवर उतरला. जाता-जाता त्याने स्वतःची ओळख करून दिली खरी, पण हेही सांगून गेला की, बाहेरचा चेहरा ही आपली खरी ओळख नसते. स्वतःला स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल तर आपल्या आतल्या चेहऱ्याकडे पाहण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे…!

आपण तासन्‌तास स्वतःला आरशात न्याहाळतो. आपल्या चेहऱ्याचे बारीक निरीक्षण करतो. समोरचा आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो, पण तस पाहायला गेलं तर आपले दोन चेहरे असतात. एक समाजाला दिसणारा (किंवा आपण दाखवतो तो म्हणा) असा तो बाहेरचा. आणि एक जो आपल्या आत दडलेला असतो, असा आतला.

खरं तर आतल्या चेहऱ्याची आपली स्वतःशी पुसटशीच ओळख असते. कारण आपण कधी स्वतःमध्ये डोकावून पाहतच नाही. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतील. आता हेच बघा ना, एखादा माणूस कपटी, धूर्त असेल तर त्याला स्वतःमध्ये डोकावताना लाज वाटत असावी, कारण आत त्याचं खरंखुरं प्रतिबिंब त्याला न्याहाळत असतं. याउलट एखादा नि:स्वार्थी, दयाळू स्वतःमध्ये डोकावताना बिनधास्त असतो. कारण त्याचा आतला आणि बाहेरचा चेहरा एकच असतो.

विचार : शोध स्वत:चा (भाग 2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)