#आगळेवेगळे देवा : गणराया.. एवढे कर रे बाप्पा  (भाग १)

-अनुराधा पवार

गणपती जवळ आले की आमच्या काकांच्या कपाळाला आठ्या पडतात. ते तसे नास्तिक वगैरे मुळीच नाहीत. बरेच देवभक्त आहेत. घरात पूजाबिजा करतात, संध्याकाळी अगरबत्ती लावतात. पण गणपती उत्सव म्हटले की ते प्रचंड वैतागलेले असतात.

हा वैताग तोंडाने बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर ते अगदी स्पष्ट-अगदी चंद्रावरील माणसालाही स्पष्टपणे दिसू शकेल एवढे स्पष्ट.

आणि त्यांच्या नाराजीचे कारण असते गणपतीत असणारी प्रचंड गर्दी. पूूर आलेली नदी दुथडी भरून वाहते म्हणतात ना, तसे माणसांनी दुथडी भरून वाहून जणारे रस्ते असतात पुण्यातील.

खरं तर गणपती उत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव. आणि हा आनंदाचा उत्सव हा गर्दीचाही उत्सव असतो. प्रचण्ड्‌ गर्दीचा!
गणपतीच्या दिवसात रस्ते इतके भरभरून वाह्त असतात, की काही विचारायची सोय नाही. आणि पुण्यात तर फारच. खरं तर पुण्यात गर्दी नसते कधी हा सतत पडणारा आणि उत्तर न सापडणारा प्रश्‍न आहे. पाहावं तेव्हा पुण्यातील रस्ते भरभरून वाह्तच असतात.

इतकी माणसे आणि इतकी वाहने कोठून येतात हा एक यक्षप्रश्‍नच आहे. येथे रस्त्यांना वर्षभर वाहनांचा पूर आलेला असतो; गणपती उत्सव-नवरात्र या काळात आणि आणि सणासुदीच्या काळात माणसांचा पूर-पूर कसला त्सुनामीच ती.

आजवर पुण्याच्या अनेक व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. पेन्शनरांचे पुणे ही दीर्घकाळ टिकलेली पुण्याची व्याख्या. उत्तम हवामान, शांत वातावरण, शांत-मनमिळावू माणसे म्हाताऱ्या माणसांनी अगदी निश्‍चिंतपणे जगण्यासाठी सर्वोत्तम शहर असे पुण्याचे सार्थ वर्णन केले जायचे.

दुसरा बाजीराव हा पुण्यातील पहिला पेन्शनर असे माझा एक भाऊ कधी कधी गमतीने म्हणतो. त्याला म्हणे इंग्रज पेन्शन देत असत. आता त्यात खरे खोटे किती परमेश्‍वर जाणो. पण पेन्शनरांचे पुणे ही पुण्याची ओळख अगदी सार्थ होती.

विद्येचे माहेरघर ही पुण्याची आणखी एक सार्थ ओळख. आता मात्र विद्येच्या माहेरघरापेक्षा विद्येची (घाऊक) बाजारपेठ असे पुण्याचे वर्णन करायला काही हरकत नाही. सगळ्या प्रकारचे शिक्षण पुण्यात मिळते. फक्त घेणारा पाहिजे. आणि त्याहून जास्त म्हणजे परवडून घेणारा पाहिजे.

#आगळेवेगळे : देवा गणराया.. एवढे कर रे बाप्पा (भाग २) 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)