रुपयाचे मूल्य ऐतिहासिक नीचांकावर 

आयातदारांकडून डॉलरच्या मागणीत मोठी वाढ 
अमेरिकेने व्याजदरात पाव टक्‍का वाढ केली आहे. तेथील विकासदर वाढत आहे. त्यामुळे महागाई वाढू नये म्हणून अमेरिका आणखी व्याजदरात वाढ करणार आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूक परत जात आहे. चलन बाजारातील व्यापारी यामुळे डॉलर स्वत:जवळ बाळगण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे. त्याचबरोबर ते कोणत्या पातळीवर स्थिरावेल याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे. 
सैफ मुकदम, विश्‍लेषक, बीएनपी परिबा 
मुंबई: डॉलर वधारत असल्याने परकीय गुंतवणूक परत जात आहे. त्याचबरोबर महाग होत असलेल्या क्रुडमुळे भारताची चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे डॉलरची मागणी वाढून रुपयाचे कोसळणे चालूच आहे. आजही रुपयाचे मूल्य 30 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव डॉलरला 74.06 रुपये या पातळीवर गेला. निवडक खरेदीमुळे शेअरबाजार निर्देशंकात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी त्याचा रुपयाचा आधार मिळू शकला नाही.
सकाळपासूनच रुपयाचे कमी कमी होत होते. नंतर पुन्हा डॉलरची मागणी वाढल्यानंतर ते कमी होत गेले. गेल्या पाच दिवसापासून रुपयाचे मुल्य एकतर्फी कमी होत आहे. शेअरबाजार निर्देशांक कमी होत आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य कमी होत आहे. त्यामुळे भांबावलेल्या गुंतवणूकदारांना धीर देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंक उपायोजना करीत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. मात्र, तरीही डॉलर परत जात असल्यामुळे रुपयाचा भाव सुधारत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अमेरिका आणि इराणचे संबंध खराब होत आहेत. त्याचा परिणाम क्रुडच्या किमतीवर आहे. भारताने जरी इराणकडून तेल घेण्याचे ठरविले असले तरी अमेरिकेने त्याबाबत ताठर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. यामुळे महाग किमतीवरही तेल मिळण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीनचे व्यापारयुद्ध चालू आहे. त्याचाही चलन बाजारावर परिणाम होत आहे. केवळ एकट्या भारताच्या चलनावर परिणाम झालेला नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. मात्र त्यामुळे शेअरबाजार किंवा चलन बाजारातील वातावरण सकारात्मक झालेले नाही.
व्यापारयुद्धामुळे आता चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चीनने काल 109 अब्ज डॉलरची भांडवल सुलभता निर्माण केली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला हादरे बदत असल्यामुळे त्याचा जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. त्याचा परिणाम चलन बाजारावर होत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेने केलेल्या पाव टक्‍का व्याजदर वाढीमुळे अमेरिकन रोख्यातून परतावा वाढत असल्यामुळे परकीय गुंतवणूक डॉलर केंद्रीय वित्तीय उत्पादनांत होत आहे. शुक्रवारी परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर आणि रोखे बाजारातून 3370 कोटी रुपये काढून घेतले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)