रुपयाचे मूल्य ऐतिहासिक नीचांकावर परदेशी गुंतवणूक चालली

रोखे व्यवहारावरील नफ्यावर लावण्यात आलेला कर, कमकुवत होणारा रुपया या कारणामुळे या वर्षात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे डॉलर बाहेर जात आहे. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. या वर्षात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी 14 हजार कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने दोनवेळा व्याजदरात वाढ केली आहे. त्याचबरोबर आगामी काळातही व्याजदरात वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार डॉलर केंद्रित गुंतवणूक करीत असल्यामुळे ते भारतातून परत जात असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

नवी दिल्ली, चालू खात्यावरील तूट वाढल्याने आणि त्यातच क्रुड वधारल्याने डॉलरची मागणी वाढून रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले. सकाळी तर रुपया 49 पैशांनी घसरून 69.10 रुपये प्रति डॉलर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला होता. मात्र, नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. दिवसअखेर डॉलरचे मूल्य कालच्या तुलनेत 18 पैशांनी कमी होऊन 68.79 रुपये प्रति डॉलर या पातळीवर स्थिरावले. या घटनाक्रमामुळे आयातदकरात खळबळ माजली आहे. त्यांना आयात करताना अधिक रुपये देऊन डॉलर विकत घ्यावे लागणार आहेत.

भांडवली नफ्यावरील करापासून सुरुवात
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी महिन्यात शेअरबाजारातील नफ्यावर दीर्घ पल्ल्याच्या भांडवली नफ्यावर कर लावल्यानंतर शेअरबाजारात विक्रीचा जोर वाढल्यापासून रुपयांचे मूल्य कमी होण्यास सुरुवात झाली आहे. एक तर या गुंतवणूकदारांना विकसित देशात केलेल्या डॉलरमधील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळणार आहे. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे रुपयातील गुंतवणुकीतून कमी परतावा मिळणार आहे. विविध कारणामुळे डॉलर इतर चलनाच्या तुलनेत वधारत आहे. त्यात अमेरिकेने केलेल्या व्याजदरवाढीचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंधन आयात महाग होत आहे                                                                                          जून 2017 पासून क्रुडचे दर वाढत आहेत. मे महिन्यात ते 80 डॉलर प्रति पिंपावर गेले होते. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्‍के इतके क्रुड आयात करतो. आता इराण आणि अमेरिकेदरम्यानचा तणाव वाढत आहे. काल अमेरिकेने इराणमधून होणारा तेलाचा पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे क्रुडचे दर कालपासून वाढत आहेत. भारत मोठ्या प्रमाणात इराणमधून तेलाची आयात करतो. हे प्रकरण थोडक्‍यात संपणारे नाही. त्यामुळे भारताचा आयातीचा खर्च वाढू शकतो. याचा थेट परिणाम चालू खात्यावर होऊन रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे.

व्यापारयुद्धाचा परिणाम
अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशाबरोबर व्यापारयुद्धाची घोषणा केली आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. मात्र, जागतिक व्यापारावर अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धाचा परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील वस्तूचे दर कमी होत आहेत तर डॉलर आणि येन महाग होत आहे. त्याचा परिणाम रुपयासह इतर देशांच्या चलनावर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)