रुपया ऐतिहासिक नीचांकावर

मुंबई: क्रूड तेलाचे भाव वाढत आहेत. त्याचबरोबर जागतिक व्यापार भडकल्यामुळे रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. भारताची चालू खात्यावरील तूट वाढत असल्याचाही रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. चालू खात्यावरील तूट निर्यात वाढवल्याशिवाय कमी होत नाही. मात्र सध्या वेगात निर्यात वाढवण्याचा कोणताही उपाय सरकार समोर नाही. या कारणामुळे रुपयाचे मूल्य घसरत आहे. चालू वर्षात आतापर्यंत रुपयाचे मूल्य 14 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यामुळे आयातदार भांबावले आहेत.
आज एकवेळ होऊन कोसळून प्रति डॉलरला 73.77 रुपये या पातळीपर्यंत गेला होता. मात्र नंतर रिझर्व बॅंकेने डॉलरच्या खरेदीद्वारा हस्तक्षेप केल्यानंतर त्यात थोडीशी सुधारणा झाली. दिवसाअखेर रुपयाचे मूल्य कालच्या तुलनेत 24 पैशांनी कमी होऊन 73.57 या पातळीवर बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)