फास्ट ट्रॅक पद्धतीने अयोध्या केस चालवा : केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद

लखनौ: सर्वोच्च न्यायालयाने फास्ट ट्रॅक पद्धतीने अयोध्या प्रकरणाची केस चालवावी अशी सुचना विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. शबरीमला प्रकरणात वेगवान पद्धतीने निर्णय लागू शकतो तर अयोध्या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाला वेगवान सुनावणी घेऊन निर्णय देणे शक्‍य आहे त्याचा त्यांनी विचार करावा अशी सुचनाही त्यांनी केली आहे.

सोमवारी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे उद्‌घाटन प्रसाद यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होंते. त्यांनी जाहीरपणे सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची तातडीने सुनावणी पुर्ण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की शबरीमला प्रकरणात जर वेगवान पद्धतीने निर्णय होतो तर राम मंदिराचा प्रश्‍न 70 वर्ष का प्रलंबीत राहिला याचे उत्तर मिळाले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधिश एम. आर शहा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश गोविंद माथुर हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच केंद्रीय विधी मंत्र्यांनी अशी जाहीर सुचना करण्याला महत्व आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही बाबराला का पुजावे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. घटनेची प्रत उंचावून त्यांनी नमूद केले की यात राम, कृष्ण आणि अकबराचा उल्लेख आहे पण घटनेत बाबराचा उल्लेख कोठेही नाही. पण आम्ही जेव्हा असे विषय उपस्थित करतो तेव्हा देशात वेगळाच वाद निर्माण होतो असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात येत्या 4 जानेवारी रोजी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्यायाधिशांच्या नियुक्तीसाठी ऑल इंडिया ज्युडिशियल सिस्टीम सुरू करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)