धुळ्याच्या महापौरपदासाठी रस्सीखेच

चार नगरसेवकांची नावे चर्चेत

धुळे: धुळे महापालिकेच्या स्थापनेनंतर 15 वर्षाच्या कालावधीत भाजपची प्रथमच एकहाती सत्ता आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत भाजपने 49 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचाच महापौर होणार हे निश्‍चित असून हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी रस्सीखेच सुरू असून भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे, नगरसेविका भारती माळी, नगरसेवक शीतल नवले, हर्ष रेलन यांची नावे सध्या चर्चेत आहेत. महापौरपदाच्या या शर्यतीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या दोन सदस्यांची नावेही अग्रस्थानी आहेत.

सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन गरमा-गरमीचा असलेला माहोल लक्षात घेता ओबीसी वर्गाच्या उमेदवाराला धुळे महापालिकेच्या महापौरपदी विराजमान करुन धुळे शहरातील ओबीसी समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

भाजपचे प्रदीप कर्पे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. नगरसेवकपदाचा यापूर्वीचा त्यांचा अनुभव लक्षात घेता प्रदीप कर्पे यांचे नाव “टॉप फोर’मध्ये आहे. माजी आणि सध्याच्या विद्यमान नगरसेविका भारती माळी यांचे महिला उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. महापौरपदासाठी महिला उमेदवाराला प्राधान्य देण्याचा विचार असल्याने भारती माळी यांच्या नावाचीही चर्चा आहे .

धुळे महापालिकेचे माजी महापौर मोहन नवले यांचे पुत्र शीतल नवले हे नगरसेवकपदी प्रथमच निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या शीतल नवलेंसह आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे हर्ष रेलन यांचे. साधारण 15 दिवसांच्या आत महापौरपदाच्या निवडीसाठी महापालिकेची विशेष महासभा होऊन त्यात महापौर कोण, हे निश्‍चित होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)