#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग १)

-अश्विनी महामुनी

कालचीच गोष्ट. मी बसने प्रवास करत होते. बसला गर्दी होतीच. बसला गर्दी नसते कधी हा एक संशोधनाचा विषय आहे. प्रयत्ने वाळूचा कण रगडिता तेलही गळे : .. असे काहीसे एक सुभाषित म्हणा वा कवितेचा चरण म्हणा आहे.

वाळूतून तेल गळेल, मृगजळाचे पाणी पिऊन तहानेलेल्याची तहान भागेल, रानात कधी सशाचे शिंगही मिळेलः अशा अनेक अशक्‍य गोष्टी मिळतील असे त्या सुभाषितात म्हटले आहे, आणि शेवटी म्हटले आहे, की मूर्खाचे मन मात्र बदलू शकणार नाही. यात बदल करून असे म्हणता येईल, की पुण्यात गर्दी नसलेली बस मिळणार नाही. हा गमतीचा भाग झाला.

त्या दिवशीची गोष्ट अशी-गर्दी असलेल्या बसमध्ये दोन मध्यमवयीन माणसे चढली. त्यांनी बसवर एक नजर फिरवली. बसायला सोडा, नीट दोन्ही पाय टेकून उभे राहता येईल एवढे जागाही नव्हती बसमध्ये. लेडीजची साईड पूर्ण लेडीजनीच भरली होती आणि उजव्या-पुरुषांच्या बाजूलाही निम्म्याहून जास्त जागा मुली-महिलांनी भरल्या होत्या.

हे पाहून एक जण वैतागून म्हणाला, अरे, 50 टक्‍के आरक्षण दिले तरी मुली आमच्या जागांवर अतिक्रमण करतात. मोठे कठीण झाले आहे आजकाल बसने प्रवास करणे.

त्याचे खरचे होते. कोणत्याही बसमध्ये पाहा. महिलांची बाजू महिलांनी अडवलेली असतेच, पण उजव्या बाजूलाही महिला बहुसंख्य जागा राखून असतात.

आज कोणतेही क्षेत्र महिलांना वर्ज्य राहिलेले नाही. कला, क्रीडा, शिक्षण…सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, आज भारताची संरक्षणमंत्री एक महिला आहे,परराष्ट्र मंत्री एक महिला आहे.

सर्वच क्षेत्रात उच्च पदांवर महिलांचे प्राबल्य आहे. अगदी गगनाला गवसणी घालण्यातही महिला मागे नाहीत. फायटर प्लेन्सच्या वैमानिक आहेत महिला.

हे सारे पाहून आठवतात तुकाराम महाराज  ‘पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे.

#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)