कृष्ण देव आहे काय? आरटीआयमधून मागितली माहिती 

Bhopal: Students dress up as Lord Krishna for Janmashtami celebration in a school in Bhopal on Monday. PTI Photo (PTI8_14_2017_000009A)
मथुरा: भ्रष्टाचार, एखाद्या अधिकाऱ्याने केलेली लपवाछपवी किंवा एखादी अत्यंत महत्त्वाची माहिती मागवण्यासाठी साधारणपणे माहितीच्या आधिकारातून (आरटीआय) माहिती मागवली जाते. मात्र, छत्तीसगडच्या एका व्यक्तीने भगवान श्री कृष्णाबद्दलच माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली आहे. कृष्ण देव आहे का? त्यांचा जन्म कुठं झाला? त्यांचं बर्थ सर्टिफिकेट आहे काय? त्यांचं गाव कोणतं? त्यांनी ज्या लीला केल्या त्याला काही आधार आहे का? आदी प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
जैनेन्द्र कुमार गेंदले असे या छत्तीसगडच्या आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने मथुरेतील जिल्हा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारातून ही माहिती मागवली आहे. 3 सप्टेंबर रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सुट्टी जाहीर करून श्री कृष्णाचा जन्मदिन साजरा केला केला जातो. त्यामुळे कृपया त्यांचं बर्थ सर्टिफिकेट देण्यात यावे. त्यामुळे त्यांचा जन्म त्याच दिवशी झाला होता का? हे सिद्ध होईल, असं गेंदले यांनी आरटीआयमध्ये म्हटले आहे. श्री कृष्ण खरोखरच देव होते का? होते तर ते कसे? त्यांचे देव असण्याचे निकष काय आहेत? त्याला काय आधार आहे? याची माहिती देण्याची विनंतीही आरटीआयमधून करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर गेंदले यांनी कृष्णाच्या गावाची माहितीही विचारली आहे.
गेंदले यांच्या या प्रश्नांनी जिल्हा प्रशासनाला घाम फुटला आहे. धार्मिक प्रश्‍नांशी निगडीत असलेल्या या प्रश्‍नावर काय उत्तर द्यावं यावर जिल्हा प्रशासन विचार करत आहे. हिंदू धर्माशी संबंधित सर्व ग्रंथ आणि पुस्तकात कृष्णाच्या जन्माविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यांचा जन्म द्वापर युगात तत्कालीन शौरसेन (आताची मथुरा) जनपदात झाला होता. त्यांनी राजा कंसचा वध करण्यासह द्वारका सोडण्यापूर्वी अनेक लीला केल्या होत्या, असं मथुरेचे एडिएम रमेश चंद्र यांनी सांगितलं आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)