‘आरटीई’ निधी देण्यापूर्वी होणार तपासणी

विद्यार्थ्यांची हजेरी, सरलप्रणालीचा होणार उपयोग

निधीसाठी या असतील अटी

शाळांना आरटीई मान्यता आवश्‍यक आहे. तसेच शाळेचे लेखा परीक्षण सनदी लेखापालामार्फत झालेले असावे. त्यात शैक्षणिक शुल्काचा उल्लेख हवा. आरटीई मान्यता प्रमाणपत्र तसेच ऑडिट रिपोर्ट असल्याशिवाय शाळांना प्रतिपूर्ती देऊ नये असे सांगितले आहे. खासगी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी करावी. शाळांनी शासनाकडून अथवा स्थानिक स्वराज्य संस्थाकडून जागा सवलतीच्या दरात घेतली असेल त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल. तसेच शाळांनी पहिली ते आठवीच्या शुल्कची माहिती सरल पोर्टल व त्यांचे संकेतस्थळ असल्यास त्यावर प्रसिध्द करावी.

नगर – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या 25 टक्‍के राखीव जागावरील प्रवेशासाठी सरकारकडून निधी देण्यापूर्वी स्वतंत्र पथकाकडून शाळांची तपासणी होणार आहे. त्याचा मेळ बसल्यानंतरच निधी दिला जाणार आहे. यामुळे बोगस विद्यार्थी किंवा सरल प्रणालीत दाखल विद्यार्थी वर्गात आहे की नाही याची पडताळणी होणे शक्‍य होणार आहे.

25 टक्के राखीव जागांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर निश्‍चितीसाठी, तसेच त्यातील सुधारणाबाबत शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 6 सप्टेंबर रोजी बैठक झाली. सरकारने शाळांना 2016-17 मध्ये मंजूर झाल्याप्रमाणे 2017-18 मध्येही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती द्यावी, असा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर तपासणी समिती किंवा पथकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून सर्व शाळांत निधीचे वाटप करण्यात आलेले आहे. 2016-17 पर्यंत शाळांना 1 कोटी 50 लाख हजार रुपये मंजूर झालेले आहेत.

अशी होईल तपासणी

पथक प्रत्येक वर्गात 25 टक्के प्रवेशाची हजेरी घेणार आहे. तपासणीचा अहवाल वरिष्ठांना देणार. शाळेचे शुल्क व पालक-शिक्षक समितीचा शुल्काबाबत ठराव, याचाही विचार होणार. त्यानंतर निधी मिळणार आहे.

संचालकांना अहवाल जाणार

परिपत्रकानुसार आरटीई प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती देण्यापूर्वी शाळांची स्वतंत्र पथकाव्दारे तपासणी केली जाईल. सरल प्रणालीमधील माहिती व प्रत्यक्षात हजेरी घेतानाची स्थिती याची खातरजमा केली जाईल. तपासणी अहवाल संचालक कार्यालयाकडे पाठवला जाईल. प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवली नसल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)