आरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी

नवी दिल्ली : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचच्या (मार्क्सवादी) मुख्य कार्यकारी समितीचे सदस्य एस रामचंद्रन पिल्लई यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ‘तालिबानी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांशी’ केली. सबरीमाला प्रकरणाचा ठपका देखील त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच ठेवला.

“आरएसएस हे तालिबान आणि खलिस्तानी आतंकवादी संघटनांप्रमाणे वागत आहे. सबरीमाला प्रकरणात आरएसएसने परिस्थिती स्फोटक बनवण्यासाठी हातभार लावला. यावरून काय सिद्ध होते? त्यांनी शांतीप्रिय मार्गाने वाटचाल करायला हवी.” असे वक्तव्य त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)