नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आज पंचतत्वात विलीन होतील. आज देशभरातून अटलजींना श्रध्दाजंली वाहिली जात आहे.अटलजींच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासून ते संघ प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, वाजपेयींच्या जाण्यानं माझं पितृछत्र हरपलं.

दरम्यान संघ प्रमुख मोहन भागवत यांनी ट्विट करत म्हटले आहे की,  अटलजींचे जाणे हे राजकारणातील एका युगाचे शेवट होण्यासारखे आहे. त्यांची जागा भरून काढणे अशक्य आहे. अटलजींसारखे व्यक्तिमत्व युगामध्ये एकदाच होऊ शकतं.

पुढे ते म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि मुल्यांना आपल्या विचार आणि आचरणांनी राष्ट्र जीवनात प्रतिष्ठित करणारे, एक प्रखर आणि स्विकृत व्यक्तीमत्व आपल्यातून गेले आहे. समाज जीवनात  ही कमी भरून काढणे सोपे असणार नाही. त्यांच्या पुण्यस्मृतीस शतश: नमन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)