मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपवर टीका केली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपाने जीएसटी’ला विरोध केला. सत्तेत आल्यावर मात्र जीएसटी लागू करत इतर सर्व कर रद्द केले गेले. मग ‘कृषी कल्याण अधिभार’ (KKC) या रद्द करण्यात आलेल्या योजनेतून कर वसुली कशी काय करण्यात आली? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. ही वसुली थोडी-थोडकी नाही, तर तब्बल १३०० कोटींची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जुलै २०१७ नंतरही हा कर गोळा केल्याची माहिती हा माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामुळे उघड झाली. कर वसुलीच्या नावाखाली सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या भाजपा सरकारला लाज कशी वाटत नाही?, असे फटकारेही राष्ट्रवादीने लगावले आहेत.
द वायर मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जवळजवळ १३०० कोटी रुपयांचा कर आधीच रद्दबातल झालेल्या ‘कृषी कल्याण अधिभार’ (KKC) च्या अंतर्गत गोळा केला आहे. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर सर्व कर रद्द करण्यात आले. त्यामध्ये ‘कृषी कल्याण अधिभार’ चा देखील सहभाग होता. मात्र रद्द केलेल्या कारामार्फत सरकारने वसुली केल्याचे समोर आले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1128574974434762752