सातारा- जावलीतील 23 विकासकामांसाठी 1 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर

सातारा – आमदार फंडासह विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदासंघात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवला आहे. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदांना सहायक अनुदान (2515) या योजनेतून त्यांनी सातारा आणि जावली तालुक्‍यातील विविध 23 विकासकामांसाठी तब्बल 1 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला आहे.

राज्यातील गावांतर्गत मुलभुत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून शासनाला प्रस्ताव प्राप्त होत असतात. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही सातारा आणि जावली तालुक्‍यातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामांचे प्रस्ताव संबंधित विभागांमार्फत शासनाकडे पाठवले होते. सदर प्रस्तावांना 2515 योजनेंतर्गत मंजूर मिळाली असून या कामांसाठी 1 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा तालुक्‍यातील सैदापूर येथील जगदेश्‍वर कॉलनी येथे बंदीस्त पाईप गटर करणे. सैदापूर येथील संभाजीनगर, आदित्य नगर आणि राणा प्रताप नगर येथे रस्ता कॉंक्रीटीककरण करणे. तसेच सैदापूर येथील अवधुत नगर येथे ओपण स्पेस मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे या कामांना मंजूरी मिळाली असून सैदापूर येथील एकूण 5 कामांसाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सातारा तालुक्‍यातील लिंब गावात 5 कामांसाठी 27 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये लिंब फाटा ते लिंब चौक अखेर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये. लिंब येथील नवीन गावठाण दादाच्या घरापाठीमागे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे. रामेश्‍वर रस्ता खडीकरण करणे. पवळेश्‍वर नगर येथे गटर करणे आणि दुल्हा टेक लिंब अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे या कामांसाठी 12 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

गवडी येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे तसेच घोडेवस्ती ते मधली वाडी हा रस्ता तयार करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. नुने येथील अंतर्गत रस्ता तयार करणे आणि डोळेगाव येथे अंतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. खडगांव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे. निगुडमाळ येथे पोहोच रस्ता खडीकरण करणे. ताकवली येथे संरक्षण भिंत बांधणे. आंबवडे बु. येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आणि सोनवडी- खामकरवस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसवणे या कामांनाही भरिव निधी उपलब्ध झाला आहे.

जावली तालुक्‍यातील दिवदेव अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 8 लाख रुपये, बेलोशी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 14 लाख रुपये, महु अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 13 लाख रुपये तर, गावडेवाडे (खर्शीबारामुरे) येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 14 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांची तातडीने निविदा प्रक्रीया राबवून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी आणि कामे दर्जेदार करावीत अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)