किमान दोन जागा तरी आठवलेंना द्या ! ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची मागणी

मुंबई: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षासाठी (रिपाइं-आठवले गट) शिवसेना-भाजप युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा न सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना-भाजपने ईशान्य मुंबईची जागा सोडावी, अशी मागणी त्या मतदारसंघातील पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

रामदास आठवले यांनी अनके जाहीर सभांमधून आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, घाटकोपर येथील पंतनगर येथे झालेल्या एका बैठकीनंतर रिपाइंतर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आठवले यांच्यासाठी ईशान्य मुंबईचा आग्रह धरतानाच किमान दोन जागा देण्याची मागणी पदाधिकाऱयांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आठवले यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे राहुल शेवाळे करत आहेत. शिवसेना आणि भाजपने कटूता मागे ठेवत सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर केले. त्यानुसार भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)