जिनोआविरुद्ध रोनाल्डोला विश्रांती देणार

नवी दिल्ली -चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचे द्वार युवेंटसला उघडून देण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे जिनोआविरुद्धच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोला विश्रांती देण्यात आली आहे. युवेंटसला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीची संधी उपलब्ध झाली असल्याने या कमी महत्त्वाच्या सामन्यात त्याला खेळवणे धोक्‍याचे नसल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रशिक्षक ऍलेगरी मॅसिमिलिआनो यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या सामन्यापूर्वीच त्याला घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. तो खूप खेळला असून पूर्ण लयीत असल्याने त्याला विश्रांतीची गरज होती. अशा परिस्थितीत त्याने आराम करावा, हे सांगण्यासाठी त्याला पुढील व्यस्त वेळापत्रकाचीही माहिती देण्यात आली, असे मॅसिमिलिआनो यांनी सांगितले. सेरी ए लीगमध्ये 18 गुणांसह अपराजित राहून अव्वल स्थानावर असल्यामुळेच प्रशिक्षकांकडून रोनाल्डोला विश्रांती देणे शक्‍य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)