रोहित शर्माचे आणखी एक “द्विशतक’

हॅमिल्टन : भारतीय संघाने न्यूझीलंड मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतल्याने विराट कोहलीला विश्रांती देऊन रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हा सामना रोहित शर्माचा आतंरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील 200 सामना आहे. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकवण्याची कामगिरी करणाऱ्या रोहितच्या नावे आणखी एक द्विशतक जमा होणार आहे.

200 एकदिवसीय सामने खेळणारा रोहित 79 फलंदाज ठरणार आहे तर 199 सामन्यांत त्याने 7799 धावा काढल्या आहेत. इतक्‍याच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी असून विराट कोहलीने 8767 धावा केल्या होत्या तर एबी डिव्हिलियर्स 8520 धावा कुटल्या होत्या. तर हमिश आमला याने 173 एकदिवसीय सामन्यात 7896 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे तो या विक्रमात पुढे जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)