वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड देऊ – रोहित शर्मा 

आॅस्ट्रेलियामधील खेळपट्टया वेगवान गोलंदाजांना पोषक

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियामधील खेळपट्‌टया उंच वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरतात. आणि त्यांच्याकडे आमच्या फलंदाजांपेक्षा उंच गोलंदाज आहेत याचा फायदा नक्‍कीच त्यांना होईल. मात्र, आमचे फलंदाजा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपने मुकाबला करण्यास तयार आहेत असे वक्तव्य भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मायाने केले आहे.
भारतीय संघ 21 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून मालिकेची सुरूवात टी-20 सामन्यांनी होणार आहे. तर त्या नंताऱ्‌ भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे.

यावेळी भारतीय संघ 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पर्थ किंवा ब्रिस्बेन येथे पहिला कसोटी सामना खेळनार आहे. त्यासंदर्भात बोलताना रोहित म्हणाला की, या दोन्ही ठिकाणच्या खेळपट्‌टया आणि तेथिल वातावरण हे वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हे उंच असल्याने त्यांना त्याचा फायदा जास्त होतो. त्यातच आम्चे फलंदज हे जास्त उंच नसल्याने आम्हाला त्यांच्या गोलंदाजीवर खेळणे थोडे अवघड होउन बसते, मात्र, यावेळी आम्ही त्याची पुरेपूर त्यारी केलेली असून आम्ही त्यांच्या गोलंदाजांना समर्थपने तोंड देऊ याचा मला विश्‍वास आहे. त्यासाठी आम्ही विशेश सराव देखिल केलेला आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.

भारतीय संघ आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 3 टी-20 सामन्यांनी करणार आहे. त्याअनंतर चार कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ आतापर्यंत आकरा वेळा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला असून या आकरा दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यात तीन वेळा मालिका बरोबरीत सुटली होती तर तब्बल 8 वेळा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यात गत दौऱ्यावेळी भारतीय संघ तब्बल 4-0 च्या फरकाने एकतर्फी पराभूत झाला होता. त्यामुळे सध्या कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडे विजयाच्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

जेंव्हा जेंव्हा आम्ही परदेश दौऱ्यावर जातो तेंव्हा तेंव्हा आम्हाला चांगली कामगिरी करावत्याची असते. त्याच दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा दौरा देखिल आमच्या साठी महत्वाचा दौरा आहे. आम्ही नेहमीच येथे चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. आणि मला आशा आहे की यावेळी आम्ही निश्‍चीतच चांगली कामगिरी करुन दाखवू. कारण सध्या आमच्या संघामध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे जे वातावरण आम्हाला आगामी मालिकेत निश्‍चीतच विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरेल असेही त्याने यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)