शिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा

चेन्नई – भारताने नुकतीच वेस्ट इंडीज विरुद्धची टी-20 मालिका 3-0 अश्‍या फरकाने जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचा हंगामी कर्नधार रोहित शर्मायाने सलामीवीर शिखर धवनची स्तुती करताना सांगितले की, आजच्या सामन्यात शिखरने 92 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला विजय तर मिळवून दिलाच. मात्र, त्याच्या या खेळीतून तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पुर्णपणे तयार झाला असल्याचे त्याने दाखवून दिले असून त्याचे फॉर्मात येणे हे भारतीय संघाच्या दृष्टीने फायद्याचे आहे असेही त्याने यावेळी नमूद केले.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील शेवटच्या टी- 20 सामन्यात शिखर धवनने 92 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. भारतीय संघ 182 धावांचा पाठलाग करताना भारताने 45 धावांमध्ये 2 गडी गमावले होते. त्यानंतर धवनने नवोदित यष्तीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यासह 80 चेंडूत 130 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने सामान्यासह टी- 20 मालिका 3-0 अशी एकतर्फी आपल्या नावे केली. याचा फायदा शिखरला आपल्या टी-20 क्रमवारीत देखिल झाली असून त्याने त्यात 16वे स्थान पटकावले आहे.

सामन्यानंतर झालेल्या झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, एकदिवसीय मालिकेतही शिखर चांगला खेळ करत होता. परंतु तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. शेवटच्या सामन्यात त्याने मोठी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला, ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी त्याचे लईत येणे संघासाठी खूप फायद्याचे ठरेल. यावेळी त्याने ऋषभ पंतचे देखील कौतुक करताना सांगितले, तो ऋषभाला देखील स्वतःला सिद्ध करायचे होते. या सामन्यात आम्ही लवकर दोन फलंदाज गमावल्याने त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. दबावात त्यांनी चांगली भागीदारी रचली त्यामुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो.

भारतीय संघ 21 नोव्हेंबला टी- 20 सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची सुरुवात करनार असून पहिला सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. याबाबत बोलताना रोहितने सांगितले की, ऑस्ट्रेलियाचा दौरा हा नेहमीच खडतर असतो. तेथील कामगिरीच्या जोरावर तुमच्यातील खेळाडूची पारख होत असते. परंतु, तुम्ही एखादी मालिका जिंकून जर परदेश दौऱ्यावर जात असाल तर त्या विजयाने तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो.

त्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी खूप चांगली गेली. या मालिकेत आमच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कामगिरीत सातत्याचा आभाव दिसला. परंतु, क्षेत्ररक्षणात आम्ही चांगले प्रदर्शन केले. ज्याचा आम्हा सर्वांना गर्व आहे. त्याच दृष्टीने आम्ही गोलंदाजीत कुठे कमी पडलो ते आम्हाला समजले त्या दृष्टीने आम्ही आगामी दौऱ्यात आमच्या कामगिरीत सुधारणा करु शकतो.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारताच्या कसोटी संघासह तिन्ही प्रकारच्या संघात निवडला गेला असल्यासाबाबत विचारले असता रोहित म्हणाला, भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळाल्याने मी आनंदी आहे. परंतु, मी खूप लांबचा विचार करत नाही. विंडीज विरुद्धची मालिका संपल्यामुळे मी सध्या आराम करणार आहे. कसोटी सामन्याच्या अगोदर टी- 20 मालिका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यावर सुरुवातीला मी टी-20 आणि सराव सामन्यांवरच लक्ष केंद्रित करणार आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे टी-20 मालिकेमध्ये रोहितकडे कर्णधारपदाची जवाबदारी दिली गेली होती. ती त्याने यशस्वीपणे पार पडली. याबाबत त्याने सांगितली की, प्रत्येक सामना हा वेगळा असतो. परंतु, तुम्ही जर सर्व गोष्टी साध्या आणि सहज ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळू शकते. तसाच प्रयत्न मी केला.

धोनी आणि टी- 20 मालिकेसह पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्या विषयी बोलताना त्याने सांगितले की, कृणाल हा खूप हुशार खेळाडू आहे. तो सामन्यात नवीन प्रयोग करण्यात घाबरत नाही. त्याचा भाऊ हार्दिक प्रमाणेच त्याच्यात देखील खूप आत्मविश्वास आहे. भारताला अशा खेळाडूंची गरज आहे. त्याचे वय पाहता त्याची अंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप मोठी ठरेल. टी-20 मालिका आणि कसोटीमध्ये महेंद्रसिंग धोनीचे संघात नसणे हा संघाचा तोटाच असतो. तो संघात असेल तर त्याचा अनुभव संघातील खेळाडूंसाठी मोलाचा ठरतो. त्यामुळे अनेक खेळाडूंचा खेळ बहरतो. नवोदित खेळाडूंसह मला देखील त्याच्या अनुभवाचा अनेक वेळा फायदा झाला असून तो संघासाठी महत्वाचा खेळाडू असल्याचेही त्याने यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)