#ICCWorldCup2019 : हिटमॅनचे 85 चेंडूत दमदार शतक

मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

रोहित शर्माने दमदार खेळी करत विश्वचषक2019 स्पर्धेतील दुसर तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 24 वे शतक साजरे केले आहे. रोहितने 85 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केलं.

 

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 30 षटकांत 1 बाद 172 धावा झालेल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर रोहित शर्मा 86 चेंडूत 101 तर विराट कोहली 17 चेंडूत 9 धावांवर खेळत आहे.

दरम्यान, रोहित आणि केएल राहुलनं संयमी सुरुवात करून दिली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावा जोडल्या. राहुल आणि रोहित या दोघांनी आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली. मात्र, केएल राहुल 57 धावा करत बाद झाला.

https://twitter.com/cricketworldcup/status/1140218214061957121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)