Ind_vs_WI T20 : रोहित शर्माला दोन विक्रम करण्याची संधी

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज चेन्नई येथे होणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात शतकी खेळी करताना रोहितने सात षटकार लगावले होते. या सामन्यात त्याने जर पुन्हा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना सात षटकार लगावले तर टी-20 क्रिकेटमध्ये चालू वर्षात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. या वर्षात सर्वाधिक षटकार न्यूझीलंडच्या कॉलिन मुर्नोच्या (35) नावावर आहेत. तर, रोहितच्या नावावर सध्या 29 षटकार आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याने सात षटकार लगावले तर त्याच्या नावावर हा विक्रम होऊ शकतो.

तसेच या सामन्यात रोहितला अजून एक विक्रम खुणावत आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावून त्याने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. पण या सामन्यात जर त्याने 69 धावांपेक्षा जास्त धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादितही तो अग्रस्थानी पोहोचेल. रोहितच्या नावावर सध्या 2203 धावा आहेत. तर, न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर 2271 धावा आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
8 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
10 :blush: Great
1 :cry: Sad
7 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)